Aai Kuthe Kay Karte: अरुंधती-आशुतोषच्या नात्यात वादळ? अभिनेत्री स्वरांगी मराठेची एण्ट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress swarangi marathe entry in aai kuthe kay karte serial new twist

Aai Kuthe Kay Karte: अरुंधती-आशुतोषच्या नात्यात वादळ? अभिनेत्री स्वरांगी मराठेची एण्ट्री

Aai Kuthe Kay Karte: स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आशुतोषच्या वाढदिवशी अरुंधती आशुतोषच्या बाबतीतला सर्वात मोठा निर्णय घेणार होती. म्हणजेच ती त्याल मनातल्या भावना सांगणार होती. पण आता मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. मालिकेत अनुष्काची एण्ट्री झाली असून आता अरुंधतीला तिच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा लागणार आहे.

(actress swarangi marathe entry in aai kuthe kay karte serial new twist)

हेही वाचा: Salim Khan Birthday: पत्नी, चार मुलं, घरातून विरोध असतानाही हेलनच्या प्रेमात वेडे होते सलीम खान..

अनुष्का म्हणजेच आशुतोषची खूप जुनी मैत्रीण. बऱ्याच वर्षांनंतर या दोघांची पुन्हा भेट होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरांगी मराठे अनुष्का ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. अनुष्का या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना स्वरांगी म्हणाली, ‘मी आई कुठे काय करते या मालिकेची खूप मोठी चाहती आहे. खऱ्या आयुष्यात मी दोन मुलांची आई असल्यामुळे आई काय काय करु शकते याचा अनुभव घेतच आहे. अश्यातच या भूमिकेसाठी विचारणा झाल्यावर क्षणाचाही विलंब न लावता मी होकार दिला.'

पुढे ती म्हणाली, 'घरच्यांची खंबीर साथ असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नसते. गेले कित्येक दिवस स्वरांगी तू सध्या काय करतेस हा प्रश्न मला नेहमी विचारला जायचा. आता मी अभिमानाने सांगू इच्छिते की स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मध्ये मी अनुष्का ही व्यक्तिरेखा साकारतेय. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुखने सेटवर सर्वांची ओळख करुन दिली. देशमुख कुटुंबाने मला सामावून घेतलं आहे. सेटवर खुपच सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळेच काम करताना खूप मजा येतेय. आमचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर यांच्यामुळे अनुष्का हे पात्र खुलवण्यासाठी खूप मदत होतेय अशी भावना स्वरांगी मराठेने व्यक्त केली.

अनुष्काच्या येण्याने अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात कोणतं वळण येणार हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. आता अरुंधती काय निर्णय घेणार, ती आशुतोषपासून दूर जाणार का असाही प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील.

टॅग्स :Marathi Serial