esakal | तापसी पन्नूची मोठी घोषणा; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

taapsee pannu

तापसी पन्नूची मोठी घोषणा; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूचा (taapsee pannu) नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'हसीना दिलरूबा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. तिच्या या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तापसीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून तापसीने तिच्या नव्या प्रॉडक्शन हाऊसची घोषणा केली आहे. 'आऊटसाइडर्स फिल्म्स' असं या प्रॉडक्शन हाऊसचे नाव आहे. तापसीच्या या प्रॉडक्शन हाऊसच्या नावाने सर्वांचे लक्ष वेधले. प्रांजल खांडदियासोबत तापसीने या प्रॉडक्शन हाऊसची सुरूवात केली आहे. प्रांजलने सुपर 30, 83, सूरमा, पीकू आणि मुबारकां या चित्रपटांची निर्मिती केली आहे. (actress taapsee pannu announces her production house outsiders films)

तापसीने पोस्टमध्ये लिहिले, 'बॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये मला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मला वाटले नव्हते की मी या चित्रपटसृष्टीमध्ये टिकू शकेन. पण मला लोकांचे प्रेम मिळाले. माझ्या कामावर लोकांनी जे प्रेम दिले त्याबद्दल मी त्यांना काही तरी देऊ इच्छिते. माझ्या आयुष्यात मी काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे. 'आऊटसाइडर्स फिल्म्स' हे प्रॉडक्शन हाऊस मी सुरू करणार आहे. मला माहित आहे हे जबाबदारीचे काम आहे. यासाठी मला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.'

हेही वाचा: 'मेहंदी लगा के रखना'; पहा राहुल-दिशाचा मेहंदी सोहळा

लवकरच तापसी रश्मी रॉकेट, लूप लपेटा, दोबारा या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच 'टीकू वेड्स शेरू' या चित्रपटामध्ये तापसी नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत काम करणार आहे

loading image