esakal | 'माझ्याकडं पाहा, मग बोला' घराणेशाहीच्या मुद्यावर तनिषाची संतप्त भावना
sakal

बोलून बातमी शोधा

tanisha mukherji

'माझ्याकडं पाहा, मग बोला' घराणेशाहीच्या मुद्यावर तनिषाची संतप्त भावना

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) असे काही सेलिब्रेटी आहेत ज्यांची मुलं फारशी कुणाला माहिती नाहीत. ते कधीही लाईमलाईटमध्येही (limelight) आली नाहीत. त्यांनी बॉलीवूडमध्ये थोड्याफार प्रमाणात चमकण्याचा प्रयत्न केला खरा मात्र त्यांना त्यात यश आले नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे तनीषा मुखर्जी. (tanisha mukherji) प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा (tanuja) यांची मुलगी आणि काजोलची बहिण (kajol) अशी तिची ओळख आहे. ती सध्या चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं नेपोटिझमवर व्यक्त केलेली प्रतिक्रिया. गेल्या काही वर्षांपासून हा मुद्दा चर्चिला गेला आहे. (actress tanishaa mukerji on nepotism its rubbish argument look at me and then talk yst88)

नेपोटिझमवर (nepotism) स्टार कीडला (star kid) नेहमी छेडले जाते. त्यावरुन अनेकदा ट्रोलही केले जाते. त्यावरुन त्या स्टार सेलिब्रेटींच्या मुलांच्या प्रतिक्रियाही सोशल मीडिय़ावर व्हायरल झाल्या आहेत. काहींना नेपोटिझमसारख्या मुद्दयांवर प्रश्न विचारणं म्हणजे वेडेपणा वाटतो. काहींनी त्यावर खुलेपणानं चर्चा केली आहे. सध्या तनिषानं त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय असल्याचे दिसून आले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत तनीषानं सांगितलं की, नेपोटिझम हा एक मुर्खपणा आहे. तो फसवा शब्द आहे. ज्याचा उपयोग लोक अनेकदा करताना दिसून येतात. तुम्ही जर योग्य त्या प्रमाणात मेहनत केली नाही तर तुम्हीच कुठे दिसणार नाही. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मात्र आपण त्याकडे सोयीस्करदृष्ट्या पाहत असल्यानं समस्या निर्माण झाली आहे. प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आणि तोटे आहेत. कुणालाही पहिला ब्रेक मिळताना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यातून अनेक अनुभव आपल्या वाट्याला येतात. त्यातून शिकावं आणि पुढे जावं. असं मला वाटतं.

हेही वाचा: ‘देवमाणूस’मध्ये चंदाला पाहून अजितकुमारची हरपणार शुद्ध

हेही वाचा: देशमुख कुटुंबात गौरी घेणार अरुंधतीची जागा ?; पाहा विडिओ

धर्मेंद्र यांचा मुलगा धर्मेंद्र यांच्यासारखा हवा. तनूजा यांची मुलगी ही त्यांच्या सारखीच हवी. असा अट्टाहास कशासाठी हवा. अशाप्रकारे वक्तव्य करणारे लोक हे आपलं नुकसान करतात. हे लक्षात ठेवावे. चांगले आणि वाईट याच्यातील फरक समजून घेऊन प्रत्येकानं आपली वाटचाल करावी. आलिया भट्ट जेव्हा इंड्स्ट्रीमध्ये आली होती. त्यावेळी तिच्यावरही टीका झाली होती. मात्र तिनं स्वताला मोठ्या कष्टानं सिद्ध केलं आहे. असंही तनीषानं सांगितलं.

loading image