सिंधुताईंचं जाणं माझ्यासाठी खूप धक्कादायक-तेजस्विनी पंडितTejaswini Pandit | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tejaswini Pandit,Dr.Sindhutai Sapkal

सिंधुताईंचं जाणं माझ्यासाठी खूप धक्कादायक-तेजस्विनी पंडित

आयुष्यभर अनाथांची माय म्हणून ज्या जगल्या अशा पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पुण्यात एका इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढत ठाम उभ्या राहिलेल्या माईंची मृत्यूशी लढत मात्र अपयशी ठरली. आज त्या आपल्यातनं गेल्या जरी असल्या तरी त्यांच्या कार्यानं त्या कायम आपल्यातच राहणार आहेत. समाजातील सर्वच स्तरातून त्यांच्या जाण्यामुळं हळहळ व्यक्ते केली जातेय.

अभिनेत्री तेजस्विनी पंडीतचं माईंशी खूप जवळचं नातं बनलं ते 'मी सिंधुताई सपकाळ' या सिनेमाच्या निमित्तानं.. तेजस्विनीने माईंची व्यक्तिरेखा साकारली होती. तेजस्विनीला जेव्हा सिंधुताईंनी सिनेमात पाहिलं होतं तेव्हा त्या खूप आनंदात होत्या तिचं काम पाहून. आज सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानं तेजस्विनी पूर्णपणे ढासळलीय. ईसकाळला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाली,''त्या अशा कशा लवकर जाऊ शकतात. त्यांचं जाणं माझ्यासाठी अनपेक्षित होतं. ही धक्कादायक बातमी आहे. माईंना भेटणं अलिकडे झालं नसेल तरी त्यांच्या मुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये मी होते,माईंची खुशाली कळायची मला. आज त्या सोडून गेल्या यावर विश्वास ठेवणं कठीण आहे''.

आनंद महादेवन दिग्दर्शित या सिनेमाला त्यावेळी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. स्वतः सिंधुताईंनी तेजस्विनीनं साकारलेल्या भूमिकेचं तोंडभरून कौतूक केलं होतं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top