Tunisha Sharma: 'कुछ तो गडबड है...'AICWA अधिकाऱ्याचा मोठा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tunisha Sharma

Tunisha Sharma: 'कुछ तो गडबड है...'AICWA अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Actress Tunisha Sharma Suicide: तुनिषा शर्मानं शनिवारी २४ डिसेंबर रोजी 'अलिबाबा - दास्तान-ए-काबुल'च्या सेटवर आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येने टिव्ही मनोरंजन विश्वासाठी एक मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात अनेक नवीन खुलासे झाले. आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिचा मित्र शीजान खानला अटक केली आहे. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोपही त्यांनी केले आहे. आता तो ४ दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे.

हेही वाचा: Tunisha Sharma: पोलिसांपुढे शिझान ची बोबडी वळली.. संशय बळावला.. पाहा update

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, अशी मागणी ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने (एआयसीडब्ल्यूए) केल आहे.

AICWA ने ट्विट करत याबाबत माहीती देत लिहिलयं, 'अभिनेत्री तुनिषा शर्मानं अली बाबाच्या सेटवर आत्महत्या केली. याबाबत लोकांनी सांगितलं. ही घटना नायगाव येथील स्टुडिओमध्ये घडली. याची एसआयटी चौकशी करण्याची आमची मागणी आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. ईश्वर तिच्यासआत्म्यास शांती देवो आणि कुटुंबियांना हे दू:ख सहन करण्याची शक्ती देवो.'

हेही वाचा: Tunisha Sharma: प्रेस घेत पोलिसांनी केले अनेक खुलासे.. शिझानला 4 दिवसांची पोलिस कोठडी..

एएनआयशी बोलताना AICWAचे अध्यक्ष सुरेश गुप्ता म्हणाले, 'आम्ही तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी करतो. तसेच त्याची योग्य चौकशी व्हावी अशी इच्छा आहे. आज मी तुनिषाने आत्महत्या केलेल्या ठिकाणी गेलो होतो. तेथील लोक घाबरले असल्याचं दिसून आलं आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

पुढे AICWA अध्यक्ष म्हणाले, 'काहीतरी गडबड झाली असेल. स्त्रिया सेटवर सुरक्षित नाहीत तुनिषा च्या सेटवर काम करत होती. तो सेट आत बांधण्यात आला आहे जिथं लोक ये जा करायलाही घाबरतात. सरकारने याकडे लक्ष देऊन या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी करावी. तपासानंतर अनेक बाबी समोर येतील. असही त्यांच म्हणंन आहे. त्यामूळे आता पुन्हा तुनिषाचा मृत्यू आत्महत्या आहे की ह्त्यायाबाबत पुन्हा अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.