Ashok Saraf: माझा अपघात झाला तेव्हा तुम्ही... 'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यावर अभिनेत्रीने सांगितली आठवण

अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झाला
actress varsha dandale special post for ashok saraf maharashtra bhushan award
actress varsha dandale special post for ashok saraf maharashtra bhushan award SAKAL

Ashok Saraf Maharashtra Bhushan News: ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडवले. 'महाराष्ट्र भूषण' मिळाल्यावर ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा दांडळेंनी अशोक सराफ यांच्याबद्दल खास आठवण सांगितली आहे.

actress varsha dandale special post for ashok saraf maharashtra bhushan award
Shah Rukh Khan: थरथर कापत होता फॅन, मात्र शाहरुखच्या कृतीने जिंकलं सर्वांचं मन, पाहा व्हिडिओ

अभिनेत्री वर्षा यांनी सोशल मीडियावर अशोक सराफ यांच्याबद्दल फोटो पोस्ट करुन लिहीलंय की,"प्रिय भाई अशोक सराफ अभिनेते म्हणून मोठे आहातच पण माणूस म्हणूनही खूप मोठे आहात. फक्त एकच नाटक.. "अनधिकृत " तुमच्यासोबत करण्याचं भाग्य मला मिळालं. नाटक अल्पजीवी ठरलं पण माणुसकीचे बंध मात्र आजपर्यंत टिकून आहेत.
.. माझ्या accident नंतर एव्हढया कार्यबाहुल्यातूनही तुम्ही आणि निर्मितीताई मला नाशिकला भेटायला आलात.. मला धीर दिलात.. तुम्ही स्वतः एका मोठ्या अपघाताला सामोरी गेला होतात.. ते अनुभव तुम्ही सांगितले आणि मीही यातून सुखरूप बाहेर पडेन अशी खात्री दिलीत.."

वर्षा पुढे लिहीतात, ".. आपल्या अनधिकृत नाटकात तुमच्या पात्राला एक विचित्र आजार असतो.. त्याचं वय हळू हळू मागे जातो.. म्हणजे 50 शी माणूस शेवटी दीडदोन वर्षाचा होतो.. तुम्ही काय अफलातून तो बदल दाखवत होतात भाई.. त्या नाटकातला तुमचा अभिनय हा आम्हा नवशिक्यांसाठी एक कार्यशाळा होती.. दुर्दैवाने ते नाटक चाललं नाही.. पण माझ्या साठी ते नाटकं भाग्याचं ठरलं.. तालमीदारम्यांची शिस्त, मुख्य म्हणजे वेळेवर येणे, मोबाईल strikly off ठेवणे.. इतर अनावश्यक बडबड करणाऱ्या करणाऱ्या कलाकारांना शांत राहण्याचं महत्व पटवून देणे ( अरे आपली energy वाचवारे हे तुमचं वाक्य )..

वर्षा शेवटी लिहीतात, "आपल्या रोलचा बारकाईने अभ्यास करणे.. किती आणि काय काय सांगू.. खूप वर्ष झालीत पण अनधिकृत नाटक माझ्यासाठी आजही एक अधिकृत आठवणीचा खजिना आहे.

तुम्हाला महाराष्ट्रभूषण "पुरस्कार आज जाहीर झाला.. मनापासून अभिनंदन .. पुरस्कार आज जरी जाहीर झाला असला तरी तुम्ही आम्हा सगळ्यांचे महाराष्ट्र भूषण होतात.. आहात आणि जोपर्यंत मराठी अभिनय सृष्टी आहे तोपर्यंत राहालच..
भाई तुमचं खूप खूप अभिनंदन."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com