रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर विद्या बालन हे काय म्हणाली, आम्हालाही असं.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress vidya balan reaction on ranveer singh nude photoshoot

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर विद्या बालन हे काय म्हणाली, आम्हालाही असं..

vidya balan : रणवीर सिंगचे न्यूड फोटोशूट प्रकरण अजूनही मिटलेले नाही. त्याच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. त्यानं बोल्ड फोटोशुट केलं म्हणून त्याला ट्रोल करण्यात आलं आहे. त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. अनेक घटकांकडून त्याच्यावर टीका होत आहे. पण बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी मात्र रणवीरची बाजू घेतली होती. (bollywood actors) यात त्याची पत्नी दीपिका, आलिया भट्ट, अर्जुन कपूर, प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा, स्वरा भास्कर यांच्या नावाचा समावेश आहे. आता अभिनेत्री विद्या बालन हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिनेही रणवीर (ranveer singh) ला सपोर्ट केलं असून एका कार्यक्रमात ती याबाबत बोलली. (actress vidya balan reaction on ranveer singh nude photoshoot)

मुंबईमध्ये अभिनेत्री कुब्रा सैतच्या 'ओपन‌ बुक' या पुस्तकाच्या लाँच प्रोग्रॅममध्ये विद्या बालननं हजेरी लावली होती. तेव्हा विद्याला रणवीरच्या न्यूड फोटोशूटबाबत प्रश्न विचारण्यात आलं. त्यावर या विद्या म्हणाली, 'त्यानं काय चुकीचं केलं? कधी कधी आम्हाला देखील असं काही बघायला मिळायला हवं'. विद्याच्या या गमतीशीर प्रतिक्रियेनं सगळ्यांचेच डोळे फिरले. आजवर अनेकांनी रणवीरला पाठिंबा दिला पण विद्याच्या उत्तराने मात्र सगळे अवाक झाले.

(bollywood celebrities reaction on ranveer singh nude photoshoot)

विद्या कायमच आपले विचार धिटाईने मांडत असते. तिच्या काही चित्रपटांना देखील असंच विरोध झाला होता. त्यामुळे ट्रॉलर्सला काय उत्तर द्यायचे हे ती पुरती जाणून आहे. बुधवारी रात्री मुंबईमध्ये अभिनेत्री कुब्रा सैतच्या 'ओपन बुक' या पुस्तकाच्या लाँचच्या वेळी विद्या बालनने तिच्या आयुष्यातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी विद्या बालन व्यतिरिक्त मंजरी फडणीस, नकुल मेहता, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, झाकीर खान असे अनेक सेलिब्रिटींनी या पुस्तक लाँचच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Web Title: Actress Vidya Balan Reaction On Ranveer Singh Nude Photoshoot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top