'तुम्ही कोण यावरुन ठरतं तुम्हाला कसं नटवायचं!' यामीचा धक्कादायक खुलासा|Actress Yami Gautam recalls lehenga | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yami Gautam

'तुम्ही कोण यावरुन ठरतं तुम्हाला कसं नटवायचं!' यामीचा धक्कादायक खुलासा

Bollywood Actress: आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाणारी यामी गौतम ही नेहमची चाहत्यांच्या चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. याशिवाय ती तिच्या (Yami Gautami) परखड स्वभावासाठीही ओळखली जाते. सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून यामीचं नाव घ्यावं (entertainment news) लागेल. तिच्या चित्रपटांना नेटकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. काही दिवसांपूर्वी तिचा थर्स्ट डे नावाचा चित्रपट आला होता. त्यामध्ये तिनं केलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. आता ती अभिषेक (Bollywood News) बच्चन सोबत दसवी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत असून त्याच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. एका मुलाखतीमध्ये यामीनं आपल्या वेशभुषेविषयी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.

यामीनं यावेळी आपण आपल्या लग्नात परिधान केलेल्या ड्रेसविषयी चाहत्यांना सांगितलं आहे. लग्नाच्या वेळी तिनं आईनं दिलेली साडी परिधान करण्याचा निर्णय का घेतला हे सांगितलं आहे. यामीचा गेल्या वर्षी आदित्य धरशी विवाह झाला. त्याचीही मोठ्या प्रमाणात चर्चा होती. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. आपण योग्य व्यक्तीची निवड केली असून आपण त्याच्यासोबत आनंदी असल्याचे यामीनं सांगितलं आहे. यावेळी तिनं बॉलीवूडमधल्या डिझायनरविषयी भाष्य केलं आहे. आपल्याला आतापर्यत वेगवेगळ्या डिझायनरकडून शिकायला मिळालं. मात्र काहींचा अनुभव हा कमालीचा निराश करणारा होता. त्यांचे तुमच्याप्रती असणारे विचार अनेकदा हे आपल्या करिअरसाठी धोकादायक असल्याचे यामीचं म्हणणं आहे.

हेही वाचा: Viral News: देबीना बॅनर्जी - गुरमीतच्या घरी 'नवी पाहुणी'

फॅशन डिझायनर्स हे बऱ्याचदा तुम्हाला चांगला सल्ला देतीलच असे नाही. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल ऐकीव माहितीच्या आधारे बरीचशी नकारात्मकता असते. तुम्ही कोण आहात यावरुन ठरतं तुम्हाला कशाप्रकारे नटवायचं, हे अनेकांना माहिती नाही. पण आता बॉलीवूडमधील अनेक वर्षांचा प्रवास यावरुन या गोष्टी माहिती झाल्या आहेत. असा खुलासा यामीनं यावेळी केला आहे. त्याचा दाखला देताना यामीनं आपल्या चित्रपटाचा किस्सा सांगितला होता. मला त्या डिझायनरनं सांगितलं की, तुम्हाला लेहंगा चांगला दिसणार नाही. मी त्याला विचारलं का नाही दिसणार, तुम्ही तो परिधान केल्यावर तो डिझायनर तुमच्यासोबत काम करायला तयार होणार नाही. मला ते ऐकल्यावर मोठा धक्काच बसला होता. असे यामीनं यावेळी सांगितलं होतं.

हेही वाचा: RRR Review- नावं ठेवायचा विषयच नाही, स्टोरी दणदणीत अभिनय खणखणीत

Web Title: Actress Yami Gautam Recalls Lehenga Thing Designers Dont Give You Their Outfits

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top