The Kerala Story च्या अदा शर्मानं केली बॉलीवूडची पोलखोल..म्हणाली,'इथे सेटवर अभिनेत्रीला उगाचच..'

अदा शर्मानं नुकत्याच एका मुलाखतीत बॉलीवूडमधील अनेक आतल्या गोटातील गोष्टी समोर आणत खळबळजनक आरोप केला आहे.
Adah Sharma On bollywood
Adah Sharma On bollywoodEsakal

Adah Sharma On bollywood: अदा शर्मा सध्या टॉक ऑफ द टाऊन बनली आहे. सुदिप्तो सेन दिग्दर्शित वादग्रस्त 'द केरळ स्टोरी' सिनेमात अदानं शालिनी उन्नीकृष्णची भूमिका केली आहे. याआधी तिनं छोटा पडदा तसंच हिंदी,तामिळ,तेलुगू तसंच मल्याळम सिनेमातूनही काम केलं आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत अदा शर्मानं सांगितलं की हिंदी फिल्म इंडस्ट्रीत ती चांगल्या-वाईट सगळ्या लोकांना भेटली आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्रीची एक गोष्ट जी सगळ्यात जास्त तिला खटकते ती म्हणजे इथे स्त्री आणि पुरुष यात मोठा भेदभाव केला जातो.

अभिनेत्रीनं बॉलीवूडवर लिंग भेदभावाचा खळबळजनक आरोप केला आहे. तिचं म्हणणं आहे की इथे अभिनेत्रींना सेटवर खूप लवकर बोलावलं जातं पण अभिनेते मात्र आरामात सेटवर पोहोचतात. (Adah Sharma Accuses bollywood..the kerala story actress said..read inside story)

Adah Sharma On bollywood
Ashish Vidyarthi Wedding: कोण आहे रुपाली बरुआ?.. जिच्याशी वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थींनी बांधली लग्नगाठ..

अदा शर्मानं सिद्धार्थ कन्ननच्या चॅट शो मध्ये अनेक खुलासे केले. ती पुढं असं देखील म्हणाली की, ''अर्थात याचा अर्थ असा नाही की मला कुठल्या इतर फिल्म इंडस्ट्रीत काम करताना खूप मजा आली. मी नॉर्थ आणि साऊथच्या लोकांसोबत देखील काम केलं आहे. दोन्ही ठिकाणी काही खूप चांगले तर काही हैराण करुन सोडणारी लोकं देखील होती''.

''मला आता हे पटलंय की जर तुमचा दिग्दर्शक चांगला आहे तर मग तुमची भाषा कोणतीही असो , सगळं चांगलंच होतं. पण जर तुमचा दिग्दर्शक चांगला नाही तर मग भाषेचं हे अंतर नेहमीच त्रास देऊ शकतं''.

Adah Sharma On bollywood
Rocky Aur Rani ki Prem Kahani: क्षिती जोगला बॉलिवूडची लॉटरी.. थेट रणवीर सिंग सोबत पोस्टर वर झळकली

अभिनेत्री पुढे म्हणाली, ''मी सगळ्या इंडस्ट्रीत चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही लोकांना भेटली आहे. पण मला वाटतं की बॉलीवूडमध्ये लिंग भेदभावामुळे अभिनेता आणि अभिनेत्रींच्या मानधनात देखील जो मोठा फरक आढळतो त्यावर बोललं गेलं पाहिजे''.

अदा शर्मा म्हणते, ''मला ही गोष्ट खूप विचित्र वाटते की आधी हिरोईनला सेटवर बोलवतात आणि मग सांगतात की,शूट सुरू व्हायला वेळ आहे,थांबावं लागेल. मग अभिनेत्री बिचारी शांत बसलीय..चिडचिड करत नाहीय तेव्हा हे जाऊन हिरोच्या मॅनेजरला आधी बोलावतात आणि त्यानंतर मग हिरोला सेटवर येण्यास सांगितलं जातं. आणि हिरोईन बिचारी आधीपासनंच येऊन बसलेली असते सेटवर''.

''मला बॉलीवूडमध्ये लिंग भेदभाव खूप दिसला अन् दिसतो. या अशा वातावरणात काम करायला मुळीच मजा येत नाही''.

Adah Sharma On bollywood
Aamir Khan: मुलीच्या वयाच्या फातिमा सना शेखशी तिसऱ्या लग्नासाठी तयार आमिर खान? या बड्या अभिनेत्यानं केला दावा..

अदा शर्माच्या द केरळ स्टोरीनं बॉक्स ऑफिसवर यशस्वी तीन आठवडे पूर्ण केले आहेत. तीन आठवड्यात या सिनेमानं भारतीय ब़ॉक्सऑफिसवर १९४.५७ करोड रुपयाचं नेट कलेक्शन केलं आहे.

चौथ्या आठवड्यात 'द केरळ स्टोरी' सहज २०० करोडच्या क्लब मध्ये एन्ट्री करेल यात शंकाच नाही. १५ ते २० करोडच्या बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरलेला आहे. या सिनेमाचे निर्माते विपुल शाह आणि इतर टीमची केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देखील भेट घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com