'होम मिनिस्टर घरच्या घरी'मध्ये होणार कोरोना वॉरिअर्सचा गौरव....

संतोष भिंगार्डे
Wednesday, 22 July 2020

झी मराठीवरील होम मिनिस्टर हा कार्यक्रम कमालीचा लोकप्रिय ठरलेला आहे. आदेश बांदेकर यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने या कार्यक्रमाला वेगळी उंची प्राप्त झाली आहे. कोरोनामुळे काही दिवस या कार्यक्रमाचे चित्रिकरण थांबलेले होते. परंतु आता आदेश बांदेकर आपल्या घरातूनच हा कार्यक्रम सादर करीत आहेत. 

मुंबई : कोरोना महामारीमध्ये डॉक्टर्स, नर्सेस तसेच अन्य आरोग्य कर्मचारी, पोलिस व पालिका कामगार-कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आतापर्यंत काही गाणी तसेच व्हिडीओ चित्रित झाले. त्यातून त्यांना प्रोत्साहन तसेच त्यांच्या या सेवेला सलाम करण्यात आला. आता 'होम मिनिस्टर घरच्या घरी' या विशेष भागात आदेश बांदेकर भावोजी आता कोरोना वॉरियर्स यांच्याबरोबर पैठणीचा खेळ खेळणार आहेत.

ब्राझीलच्या विनंतीनंतर ईडीची भारतात मोठी कारवाई; मुंबईचे सुद्धा आहे कनेक्शन...

झी मराठीवरील होम मिनिस्टर हा कार्यक्रम कमालीचा लोकप्रिय ठरलेला आहे. आदेश बांदेकर यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने या कार्यक्रमाला वेगळी उंची प्राप्त झाली आहे. कोरोनामुळे काही दिवस या कार्यक्रमाचे चित्रिकरण थांबलेले होते. परंतु आता आदेश बांदेकर आपल्या घरातूनच हा कार्यक्रम सादर करीत आहेत. 

पोटगीची रक्कम थकवणाऱ्या नवऱ्याला न्यायालयाचा दणका; मालमत्ता गोठवण्याचे दिले आदेश

आता कोरोना वॉरियर्सबरोबर पैठणीचा खेळ रंगणार आहे. या कोरोना वॉरीयर्सनी स्वतःच्या घरची किंवा घरच्यांची काळजी न करता इतरांचा जीव वाचवण्यासाठी सतत झटत राहिले, त्यांचा सन्मान आणि त्यांना थोडासा आनंद देण्याचा झी मराठी आणि होम मिनिस्टर हा प्रयत्न आहे. कोरोना काळात जनतेची घेतलेली काळजी आणि सोबत घरच्यांबरोबर करावा लागणारी तडजोड, या खास भागांमधून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहेत. ‘होम मिनिस्टर घरच्या घरी’चे हे विशेष भाग 27 जुलैपासून प्रेक्षकांना पाहता येणर आहेत. आज त्या विशेष भागांचे चित्रीकरण झाले आहे. 
---
संपादन : ऋषिराज तायडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: adesh bandekars home minister show will praise corona worriors