Rakhi Sawant-Adil Khan Durrani case update: टी.व्ही अभिनेत्री आणि बिग बॉस फेम राखी सावंत सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यातील वादामुळे बरीच चर्चेत आहे. राखीचं दुसरं लग्नही आता वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं दिसत आहे. राखीनं काही दिवसांपूर्वीच आपला पती आदिल खान दुर्रानी विरोधात खळबळजनक आरोप केले आहेत.
या आरोपां दरम्यान राखीनं आदिलच्या कथित गर्लफ्रेंड संदर्भातही मोठेमोठे खुलासे केले. ती म्हणाली की, आदिलचं तनु चंदेल नामक मुलीसोबत अफेअर आहे. जिनं राखीच्या वैवाहिक आयुष्यात विष कालवलं आहे.
आता पहिल्यांदाच अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या तनु चंदेलनं राखीनं केलेल्या आरोपांवर रिअॅक्ट केलं आहे.(Adil Khan Durrani girlfriend tanu chandel reaction on rakhi sawant allegations)
तनुनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आदिल-राखी यांच्यातील वादावर रिअॅक्ट होताना म्हटलं आहे की, ''राखी मी तुला आणि तुझ्या मित्रपरिवारासमोरही हे क्लीअर केलं आहे की मी तुझ्या आदिलसोबत नाही. मला सगळं कळल्यानंतर मी आदिलची बाजू घेतली नाही. हे प्रकरण तुझं आणि तुझ्या पती मधलं आहे मला यात उगाचच ओढू नकोस''.
याआधी आदिल खानची एक्स गर्लफ्रेंड रोशिलानं देखील राखी-आदिलच्या वादग्रस्त प्रकरणावर रिअॅक्ट केलं होतं. तिनं देखील इन्स्टाग्राम स्टोरीत म्हटलं होतं की,'मला तुमच्या वादात उगाचच ओढू नका,कंटाळा आलाय मला याचा'.
आदिल आणि रोशिला काही वर्षांपूर्वी रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर आदिलचं तनुशी नाव जोडलं गेलं. यासंदर्भात स्वतः राखीनं दावा केला होता.
राखी सावंतनं तनुचं नाव घेत म्हटलं होतं की,जेव्हा ती बिग बॉस मराठीत गेली होती त्यादरम्यान आदिल आणि तनु एकत्र आले. तिनं आदिलच्या शरीरावर लव्हबाइट्सही पाहिले होते. तनुनं आपलं वैवाहिक आयुष्य बर्बाद केलं असं राखी म्हणाली होती.
काही दिवसांपूर्वी राखी सावंतनं नव्या व्हिडीओत तनु चंदेलचं नाव घेत म्हटलं होतं की,''तिच्या नावातच फसवेगिरी लपलेली आहे. तनु तू माझं घर तोडलंस,माझं मन तोडलंस. मी तुला शाप देते. जो स्वतःच्या बायकोचा झाला नाही,तो तुझा देखील होणार नाही''.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.