Adipurush च्या वादाचा मेकर्सला मोठा फटका, इतक्या करोडनी वाढणार बजेट, नवीन रिलीज डेट समोर...

'आदिपुरुष' सिनेमाच्या व्हीएफएक्सवरनं टोकाचा वाद रंगल्यानं आता मेकर्सनी मोठा निर्णय घेतला आहे.
Adipurush Controversy Om Raut spends 100 crore on vfx now release in may 2023
Adipurush Controversy Om Raut spends 100 crore on vfx now release in may 2023Instagram
Updated on

Adipurush Budget: राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक ओम राऊत सध्या आपला आगामी सिनेमा आदिपुरुषमुळे भलताच चर्चेत आहे. दसऱ्याचं निमित्त साधून सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला गेला होता. पण आदिपुरुषच्या टीझरवरनं जो वाद सुरू झाला तो त्याच्या लॉन्च इव्हेंटपेक्षा मोठा होता. रावणच्या लूकमध्ये सैफ अली खानला पाहून लोक भलतेच भडकले होते. आता हा वाद थांबवण्यासाठी ओम राऊतनं शक्कल लढवली आहे. पण यामुळे त्याला १०० करोडचं नुकसान होऊ शकतं असं बोललं जात आहे.(Adipurush Controversy Om Raut spends 100 crore on vfx now release in may 2023)

हेही वाचा: भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

Adipurush Controversy Om Raut spends 100 crore on vfx now release in may 2023
Adipurush: रावणाचा लूक पाहून भडकल्या जुन्या सीतामय्या; म्हणाल्या,'रावण लंकेचा होता तर मग... '

आदिपुरुषविषयी अनेक गोष्टी समोर येत आहेत. एक म्हणजे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली गेली आहे. आणि दुसरी म्हणजे,ज्या व्हीएफएक्स वरनं वाद रंगला होता,त्याला पुन्हा रिक्रिएट करण्याच्या तयारीत मेकर्स लागले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार कळत आहे की सिनेमाच्या व्हीएफएक्ससाठी मेकर्सनी १०० करोडच्या अतिरिक्त बजेटची तयारी ठेवली आहे,म्हणजे व्हीएफएक्सच्या रिक्रिएशनवर काम करता येईल आणि सगळ्या वादातून सिनेमाची सुटका होईल. याचा अर्थ आहे की,आता आदिपुरुषचं पूर्ण बजेट ५०० वरुन ६०० करोडवर पोहोचणार आहे.

Adipurush Controversy Om Raut spends 100 crore on vfx now release in may 2023
Adipurush: रामानंद सागर यांच्या मुलाचं 'आदिपुरुष' विषयी हैराण करणारं विधान, म्हणाले...

प्रभास,कृती सनन,सैफ अली खान आणि सनी कौशल अभिनित आदिपुरुष सिनेमा खरंतर १२ जानेवारी,२०२३ रोजी रिलीज होणार होता. पण ओम राऊतला आता या सिनेमात काही बदल करायचे आहेत. आणि अशात आता सिनेमाच्या रिलीज डेट बदलण्याची दाट शक्यता आहे. बोललं जात आहे की आदिपुरुष आता मे २०२३ मध्ये रिलीज केला जाईल. अर्थात,अद्याप सिनेमाच्या बदललेल्या रिलीज डेटविषयी अधिकृतपणे काहीच बोलण्यात आलेलं नाही.

Adipurush Controversy Om Raut spends 100 crore on vfx now release in may 2023
Adipurush चा दिग्दर्शक ओम राऊत अक्षयच्या 'रामसेतू'वर स्पष्टच बोलला ; म्हणाला,'यात जे दाखवलंय ते...'

काही रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की,मेकर्सने व्हीएफएक्ससाठी नवं बजेट आखलं आहे. रावणाच्या भूमिकेतील सैफच्या आणि श्रीरामाच्या भूमिकेतील प्रभासच्या सीन्सना रीशूट नाही तर रीक्रिएट केलं जाणार आहे. रोबोट २.० सिनेमाच्या वेळेसही दिग्दर्शक शंकरने असंच केलं होतं .

आदिपुरुषच्या VFX चं कामकाज आता 'व्हीएफएक्सवाले' यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. मेकर्सनी प्रेक्षकांच्या विरोधाला महत्त्व देत आता मोठी रक्कम सिनेमावर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे सगळे बदल करण्यासाठी १०० ते १२० दिवस लागू शकतात. मेकर्सना आदिपुरुष ला घेऊन कोणतीही रिस्क घ्यायी नाही असं चित्र सध्या दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com