Adipurush: रामानंद सागर यांच्या मुलाचं 'आदिपुरुष' विषयी हैराण करणारं विधान, म्हणाले...

आदिपुरुषचा टीझर रिलीज झाल्यापासून अनेकांनी सिनेमावर ताशेरे ओढले. इतकंच नाही तर दिल्ली कोर्टात सिनेमा विरोधात याचिका देखील दाखल झालीय.
Adipurush Controversy: Ramanand Sagar's Son defends Prabhas And Saif Ali Khan's Movie
Adipurush Controversy: Ramanand Sagar's Son defends Prabhas And Saif Ali Khan's MovieGoogle

Adipurush: गेल्या अनेक दिवसांपासून 'आदिपुरुष' हा चित्रपट सतत चर्चेत आहे. टीझर रिलीज झाल्यापासून या चित्रपटावर सातत्याने टीका होत आहे. सोशल मीडिया, मनोरंजन सृष्टीतूनच नाही तर अनेक राजकीय व्यक्तींनीही चित्रपटातील दृश्ये आणि कलाकारांच्या लूकवर आक्षेप घेतला आहे. या दरम्यान आता रामायण मालिका बनवणारे रामानंद सागर यांचे चिरंजीव प्रेम सागर यांनी या चित्रपटावर आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहेत.(Adipurush Controversy: Ramanand Sagar's Son defends Prabhas And Saif Ali Khan's Movie)

Adipurush Controversy: Ramanand Sagar's Son defends Prabhas And Saif Ali Khan's Movie
Priyanka Chopra: प्रियंकावर भडकलेयत नेटकरी, म्हणाले,'ढोंगी कुठली, हिला भारत सोडून...'

नुकत्याच झालेल्या एका मुलाखती दरम्यान प्रेम सागर यांनी 'आदिपुरुष' बद्दलचे त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. मुलाखतीत ते म्हणाले, ''तुम्ही कुणालाही एखादी कलाकृती बनवण्यापासून कसे रोखू शकता? काळानुसार धर्म बदलतो. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यांना जे योग्य वाटले तेच केले. एक गोष्ट ध्यानात घ्या ओम राऊत यांनी या चित्रपटाला 'रामायण' असे म्हटलेले नाही''. प्रेम सागर यांनी मुलाखतीत सांगितले की,''जर मला असा प्रोजेक्ट मिळाला असता तर निश्चित मी तो केला नसता पण तरीही मला वाटतं की आपण आधी चित्रपट पहायला पाहिजे, आणि त्यानंतर आपलं मत व्यक्त करायला हवं''

Adipurush Controversy: Ramanand Sagar's Son defends Prabhas And Saif Ali Khan's Movie
Rekha: आणि अभिनेत्याने जबरदस्ती किस केलं..., असा होता रेखा यांचा पहिला किसिंग सीन

प्रेमसागर हे छोट्या पडद्यावरील मोठे नाव आहे. त्यांनी 'अलीफ लैला', विक्रम बेताल' यांसारख्या लोकप्रिय मालिका दिग्दर्शित केल्या आहेत. याशिवाय त्यांनी 'बसेरा' आणि 'आरजू है तू' सारख्या मालिकांची निर्मिती केली आहे.

Adipurush Controversy: Ramanand Sagar's Son defends Prabhas And Saif Ali Khan's Movie
Happy birthday Rekha: अभिनेत्री होण्याआधी सोसले हाल, वडिलांचा करायच्या तिरस्कार

आदिपुरुष संदर्भात सुरु असलेल्या वादावर याआधी रामानंद सागर यांच्या रामायणात राम,सीता,लक्ष्मणची भूमिका साकारलेल्या अरुण गोविल, दीपिका चिखलिया,सुनील लाहिरी यांनी आपला राग व्यक्त केला आहे. त्यामध्ये आता रामायण सागर यांचे चिरंजीव प्रेमसागर यांनी आदिपुरुषचं समर्थन केल्यानं सर्वच हैराण झाले आहेत. कारण त्यांच्याकडून तीव्र निषेधाची खरंतर अपेक्षा केली जात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com