Adipurush Movie : 'तुमची आता वनवासात जाण्याची वेळ झाली! तिकीट कमी करुनही...

चित्रपटातील संवाद हे इतके सुमार होते की, रामायणासारख्या गंभीर विषयाचे हसू झाले. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
Adipurush Movie
Adipurush Movieesakal

Prabhas Adipurush Box Office Collection Day 7: आदिपुरुषवरुन होऊ नये तो वाद झाला आणि त्या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांच्यावर प्रेक्षकांनी, नेटकऱ्यांनी जोरदार टीका सुरु केली. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या,सर्वसामान्य चाहत्यांच्या मनात ज्या रामायणाची प्रतिमा आहे त्याला छेद देण्याचे काम या चित्रपटानं केले असे अनेकांचे म्हणणे आहे.

प्रभु श्रीरामाची भूमिका करणारा प्रभास, रावणाची भूमिका करणारा सैफ अली खान आणि भगवंत हनुमानाच्या भूमिकेतील देवदत्त नागे यांच्या भूमिकांचे जेवढे कौतूक झाले त्याच तुलनेत त्यांच्या वाट्याला खूप सारी टीकाही आली. चित्रपटातील संवाद हे इतके सुमार होते की, रामायणासारख्या गंभीर विषयाचे हसू झाले. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

ओम राऊत यांच्या चित्रपटाकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मात्र त्या अपेक्षा काही अंशी खऱ्या झाल्या. वाद होत असला तरी या चित्रपटानं दोनशे कोटींहून अधिक कमाई केली. त्यात मार्केटिंगचा मोठा वाटा आहे. चित्रपटाचे झालेले जोरदार प्रमोशन आणि काही कलाकारांनी आदिपुरुष प्रेक्षकांनी पाहावा म्हणून घेतलेला पुढाकार याचा फायदा आदिपुरुषला झाला. तीन तासांच्या या चित्रपटानं प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात नाराजी ओढावून घेतल्याचे दिसून आले.

टीव्ही मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार, तसेच बॉलीवूडमधील सेलिब्रेटी याशिवाय यापूर्वी रामायण मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांनी देखील ओम राऊत यांच्या आदिपुरुष या चित्रपटावर सणकून टीका केली. तुम्ही रामायणाची मोडतोड केली आहे. आपल्या देवदेवतांचा अपमान केला आहे. पात्रांच्या तोंडी जे संवाद आहेत ते निराशा कऱणारे आहेत. अशावेळी या चित्रपटामागे नेमकी भूमिका काय होती असे प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत.

Adipurush Movie
Adipurush Saif Ali Khan Look: 'आम्हाला रामापेक्षा रावणच आवडला!' सैफच्या लूकची पडली भुरळ

दुसरीकडे आता मेकर्सनं जास्तीत जास्त प्रेक्षकांनी आदिपुरुष पाहायला यावा म्हणून एक वेगळी युक्ती योजली आहे. त्यांनी प्रेक्षकांना आदिपुरुषच्या तिकीटामध्ये सवलत देण्याचे कबूल केले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये हा चित्रपट थ्री डी स्वरुपात केवळ १५० रुपयांमध्ये पाहता येणार आहे. असे सांगितले आहे. त्यावरही सोशल मीडियातून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. काहींनी तर तुमचीच वनवासात जाण्याची वेळ झाली. असे म्हटले आहे.

Adipurush Movie
Mukesh Khanna On Adipurush: तर हनुमानाने तोच डोंगर उचलून निर्मात्यांच्या डोक्यात घातला असता', शक्तिमान' भडकले..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com