Mukesh Khanna On Adipurush: तर हनुमानाने तोच डोंगर उचलून निर्मात्यांच्या डोक्यात घातला असता', शक्तिमान' भडकले..

Mukesh Khanna On Adipurush
Mukesh Khanna On AdipurushEsakal

बॉलिवूडचे सुपरस्टार प्रभास , क्रिती सॅनन आणि सैफ अली खान स्टारर आदिपुरुष' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे.

एकीकडे वाद आणि दुसरीकडे वाढणारे कमाईचे आकडे यामुळे चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.

या चित्रपटाबाबत बराच गदारोळही पाहायला मिळत आहे, याशिवाय चित्रपट कमाईच्या बाबतीतही नवनवे रेकॉर्ड बनवत आहे तर नेपाळमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

Mukesh Khanna On Adipurush
Adipurush मध्ये बिभीषणच्या बायकोच्या भूमिकेत मराठी अभिनेत्री, तिचे वडीलही दिग्गज अभिनेते

या चित्रपटातील संवाद, ग्राफिक्स आणि पात्रांसाठी निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक टार्गेटवर असून या चित्रपटावर चहूबाजूने आहेत. अनेकांनी या चित्रपटावर टिका केली. त्यातच आता या अभिनेते मुकेश खन्ना यांनी देखील चित्रपटावर टिकास्त्र सोडलं आहे.

अभिनेते मुकेश खन्ना यांनी टेलिव्हिजनमध्ये खूप काम केले आहे. त्यांना शक्तीमान म्हणुनही ओळखलं जात. त्याची ही मालिका खुपच गाजली.आता त्यांनी आदिपुरुष आणि त्याच्या निर्मात्यांना लक्ष्य केले आहे. निर्मात्यांनी रामायणाचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Mukesh Khanna On Adipurush
Prabhas Casting In Adipurush: आदिपुरुषमध्ये रामाच्या भुमिकेत प्रभासच का? दिग्दर्शकानं अखेर सांगितलं कारण..

अलीकडेच त्यांनी त्यांच्या भीष्म इंटरनॅशनल यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यात त्यांनी रामायणाचा मोठा अपमान आदिपुरुषपेक्षा दुसरा काही असूच शकत नाही असं त्यानी सांगतिलं.

Mukesh Khanna On Adipurush
Adipurush मध्ये बिभीषणच्या बायकोच्या भूमिकेत मराठी अभिनेत्री, तिचे वडीलही दिग्गज अभिनेते

'ओम राऊत यांना रामायणाचे ज्ञान नव्हतं. तसेच आमच्याकडे विचारवंत लेखक मनोज मुनताशीर शुक्ला आहेत ज्यांनी आमच्या रामायणाचे कलियुगात रूपांतर केले आहे.

त्यांचे निरर्थक संवाद आणि झोप उडवणाऱ्या पटकथेने असा चित्रपट बनवला आहे की झोपेच्या गोळ्यांना लाज वाटेल.

या चित्रपटाचा कोणत्याही रामायणाशी संबंध नाही. अशा कडक शब्दात त्यांनी आदिपुरुषच्या टिमवर टिका केली आहे.'

त्याचबरोबर इतिहास आदिपुरुषच्या निर्मात्यांना असे वाईट संवाद लिहिल्याबद्दल कधीही माफ करणार नाही. असंही ते म्हणाले ओम राऊतवरही टिकेचे वार त्यांनी केले आहेत.

'त्यांच्यावर हॉलिवूड चित्रपट निर्मात्यांचा प्रभाव आणि त्यांना सिनेमॅटिक लिबर्टी घ्यायची असेल तर तुम्ही काल्पनिक फिल्म बनवली असती पण तुम्ही देवाच्या प्रतिमेशी खेळलात. म्हणूनच आदिपुरुष हा रामायणाचा भयंकर विनोद आहे', असंही ते म्हणाले

इतकच नाही तर मुकेश खन्ना यांनी चित्रपटातील मेघनाथ आणि हनुमानाच्या लूकवरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

ते म्हणाले की 'जर हनुमानजींनी आपला गेटअप या चित्रपटात पाहिला असता तर त्यांनी तो डोंगर उचलून निर्मात्यांवर फेकतील'.

रामायणात रामाची भुमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनीही या चित्रपटावर टिका केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com