आदिपुरुषचा झंझावात सुरु, दक्षिणेत प्रभासचे ५० फुटी फ्लेक्स!|Adipurush Movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adipurush Movie

Adipurush Movie : आदिपुरुषचा झंझावात सुरु, दक्षिणेत प्रभासचे ५० फुटी फ्लेक्स!

Adipurush Om Raut Director 16 June Released pre event : बॉलीवूडमध्ये पुढील आठवड्यात मोठा धमाका होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. त्याचा जेव्हा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता तेव्हापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. अफाट खर्च करुन निर्मिती करण्यात आलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे.

ओम राऊतच्या या चित्रपटामध्ये साऊथचा प्रसिद्ध अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यानं प्रभु श्रीराम यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय बॉलीवूडचा स्टार अभिनेता सैफ अली खान यांन रावणाची तर क्रिती सेनननं सीतेची भूमिका साकारली आहे. यासगळ्यात आदिपुरुषच्या निमित्तानं टॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर कुतूहल आहे. त्यांनी आतापासूनच आदिपुरुषच्या स्वागताची तयारी केली आहे.

Also Read - Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !

तिरुपतीमध्ये आज प्रभासच्या आदिपुरुषच्या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्तानं जी तयारी करण्यात आली आहे ती चकीत करणारी आहे. आदिपुरुषचा जो इव्हेंट आहे तो श्री वैंकटश्वेरय्या विद्यापीठाच्या मैदानात होणार आहे. त्यासाठी प्रभासचे ५० फुटांपेक्षा अधिक उंचीचे कट आऊट्स तयार करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. १६ जून रोजी हा चित्रपट भारतभरात सगळीकडे प्रदर्शित होणार आहे.

आदिपुरुषचा प्रीमिअर हा त्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये १३ जुन रोजी होणार आहे. तर जगभरामध्ये पाच भाषांमध्ये तो १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी या चित्रपटाच्या मेकर्सनं ट्रेलर आणि म्युझिक लाँचचा जो इव्हेंट केला होता त्यालाही प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे.

प्रभासच्या बाबत सांगायचे झाल्यास बाहूबलीनंतर त्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. त्यानंतर त्यानं साहो आणि राधेश्याम मध्ये केलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतूक केले होते. आता त्याच्या या बहुचर्चित आणि प्रतिक्षेत चित्रपटाची सगळ्यांना कमालीची उत्सुकता आहे.