Adipurush Movie: प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानासाठी एक सीट सोडणार! आदिपुरुषच्या मेकर्सचा निर्णय

Adipurush Movie News: आदिपुरुष चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा एक बिग बजेट चित्रपट आहे
Team Adipurush to dedicate one seat in every theater for Lord Hanuman
Team Adipurush to dedicate one seat in every theater for Lord HanumanSAKAL

Adipurush Movie News: आदिपुरुषचे निर्माते सिनेमाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या कल्पना अमलात आणत आहेत. याआधी आदिपुरुषचा ग्रँड ट्रेलर लाँच झाला.

त्यावेळी अजय - अतुल यांनी सर्वांना आदिपुरुषच्या गाण्याची मेजवानी दिली. आता आदिपुरुषच्या मेकर्सनी एक नवीन कल्पना आणली आहे. ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय आहे ती कल्पना जाणून घेऊ..

(Team Adipurush to dedicate one seat in every theater for Lord Hanuman )

Team Adipurush to dedicate one seat in every theater for Lord Hanuman
Akshay Bhalerao: चपाती बरोबर जात का खात नाही? अक्षय भालेराव प्रकरणावर हास्यजत्रेच्या कलाकाराची जळजळीत पोस्ट

आदिपुरुष प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी एक मोठी घोषणा करण्यात आलीय. आदिपुरुष चित्रपटगृहात जिथे चित्रपट प्रदर्शित होत आहे तिथे एक सीट राखीव ठेवण्यात येईल असे ठरवण्यात आले आहे. म्हणजे संपूर्ण शो दरम्यान एक जागा रिकामी असेल.

अशी श्रद्धा आहे की, जिथे रामायणाचा उल्लेख आहे तिथे हनुमानाचा वास असतो. या विश्वासाला पाठिंबा देत निर्मात्यांनी प्रत्येक चित्रपटगृहात बजरंगबलीच्या नावाने एक जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांना त्यांचा चित्रपट भगवान हनुमानांसमोर प्रदर्शित करायचा आहे.

आदिपुरुष चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा एक बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटाचे बजेट 500 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे.

या चित्रपटात प्रभासने प्रभू रामाची भूमिका साकारली असून क्रिती सेनन सीता माँच्या भूमिकेत दिसली आहे. याशिवाय सैफ अली खान मुख्य खलनायक म्हणजेच रावणाच्या भूमिकेत दिसला आहे.

तर हनुमानाची भूमिका देवदत्त नागे यांनी केली आहे. एक जागा हनुमानासाठी या आदिपुरुषच्या मेकर्सनी घेतलेल्या निर्णयामुळे, प्रेक्षक या कल्पनेचे कसं स्वागत करतात, हे सिनेमा रिलीज झाल्यावर कळून येईलच.

Team Adipurush to dedicate one seat in every theater for Lord Hanuman
Bal Shivaji: परशा साकारणार 'बाल शिवाजी', राज्याभिषेकाच्या ३५०व्या जयंती निमित्त सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट

प्रभासच्या आगामी आदिपुरुषचा रिलीजपूर्व (Pre - Release Event) कार्यक्रम मंगळवारी संध्याकाळी तिरुपतीमध्ये होणार आहे. या भव्य कार्यक्रमापूर्वी, प्रभासने मंगळवारी पहाटे भगवान बालाजीचे आशीर्वाद मागितले.

चिन्ना जेयर स्वामी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रभासच्या तिरुपती मंदिर भेटीचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समोर आले आहेत. १६ जुनला आदिपुरुष सिनेमा रिलीज होणार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com