Adipurush Row
Adipurush Rowesakal

Adipurush Row: 'रामायणाचा खेळ...!' राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दासांना राग अनावर

रामायणावर आधारित आदिपुरुष या चित्रपटाच्या टीझरनं आता देशातील वातावरण गरम होताना दिसत आहे. नुकताच त्याचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Adipurush Controversy: रामायणावर आधारित आदिपुरुष या चित्रपटाच्या टीझरनं आता देशातील वातावरण गरम होताना दिसत आहे. नुकताच त्याचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरुन देशातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया त्यात दिल्या आहेत. त्यात हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. काही करुन त्या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी. अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे. यासगळ्यात राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचा रागाचा पारा चढला आहे.

राम मंदिराचे मुख्य पुजारी म्हणाले, रामायणात ज्याचा उल्लेख आहे त्यापेक्षा वेगळं चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला जातोय. हे दिसून आले आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी. हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये. अशी भूमिका दास यांनी घेतली आहे. आदिपुरुषचं प्रकरण सध्या सोशल मीडियावर वेगानं ट्रोल होताना दिसत आहे. त्यामध्ये रामायणातील व्यक्तिरेखांशी छेडछाड केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी देखील हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. अशी भूमिका घेतली आहे. चर्चेत राहण्यासाठी आणि प्रसिद्धकरिता अशाप्रकारच्या गोष्टी केल्या जात आहे. असेही दास यांनी म्हटले आहे.

आदिपुरुषमध्ये भगवान राम, हनुमान आणि रावण यांचे चुकीच्या पद्धतीनं चित्रण केले आहे. दास यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी. या चित्रपटामध्ये जे दाखवण्यात आले आहे त्यामुळे चाहत्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. रामायण हे महाकाव्य म्हणून ज्याप्रकारे आपल्यासमोर आले तसे त्या चित्रपटाच्या टीझरमध्ये नाही.

Adipurush Row
Jaya Bachchan: 'लाज कशी वाटत नाही सेल्फी घ्यायला'? जया बच्चन चाहत्यांवर संतापल्या

आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, चित्रपट तयार करणे हा गुन्हा नाही. मात्र तो चित्रपट चर्चेत यावा म्हणून आपण काहीही करणं हे चुकीचे आहे. नवरात्रीच्या दरम्यान आदिपुरुषचा टीझर प्रदर्शित झाला होता. तो प्रदर्शित होताच सोशल मीडियावरून लाखो नेटकऱ्यांनी त्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटातील मुख्य पात्र प्रभासनं अयोध्यामध्ये या चित्रपटाचा टीझर रिलिज केला होता.

Adipurush Row
LSC On Netflix: आमिरनं नेटफ्लिक्सवर गुपचूप प्रदर्शित केला 'लाल सिंग चढ्ढा'!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com