Adipurush Dialogue: हे आहेत आदिपुरुषचे टॉप डायलॉग..ऐकून श्रीरामाचं स्मरण अन् अंगात स्फुरण संचारलंच पाहिजे..

'आदिपुरुष'च्या टीझर नंतर जेवढा वाद रंगलेला पहायला मिळाला त्याच्या उलट सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाल्यानंतर सिनेमाविषयी उत्सुकता वाढलेली दिसतेय.
Adipurush Dialogue
Adipurush DialogueEsakal

Adipurush Dialogue: प्रभास,सैफ अली खान,क्रिती सनन,सनी सिंग आणि देवदत्त नागे सारख्या सिनेमातील कलाकारांनी सजलेला 'आदिपुरुष'चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. टीझरच्या तुलनेत ट्रेलर एकदम दमदार आहे. प्रभू श्रीरामाच्या व्यक्तिरेखेत प्रभास आपली छाप सोडताना दिसतो तर दोन सीनमध्ये दिसलेल्या रावणाच्या रुपातील सैफनं मैफिल लुटून नेली आहे.

मनोज मुंतशिरनं या सिनेमाचे डायलॉग लिहिले आहेत. ट्रेलरमध्ये एक दोन नाही तर चक्क असे पाच डायलॉग आहेत,जे अंगावर शहारा आणतात. सगळ्यात दमदार डायलॉग प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासनं बोलले आहेत.

बाहुबली मध्ये प्रभासला आवाज देणारा शरद केळकरच आदिपुरुषसाठी प्रभासचा आवाज बनला आहे. शरद केळकरच्या आवाजाचे चाहते दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.(Adipurush Top Dialogue Trailer Release)

Adipurush Dialogue
The Kerala Story: 'एकट्यानं घराबाहेर पडू नकोस..'; 'द केरळ स्टोरी' सिनेमाच्या टीम मेंबरला धमकी..वाचा सविस्तर

हे आहेत आदिपुरुषमधील टॉप डायलॉग..

‘जानकी में मेरे प्राण बसते हैं और मर्यादा मुझे अपने प्राणों से भी अधिक प्रिय है’- प्रभास

‘हम जन्म से नहीं कर्म से छोटे या बड़े होते हैं’- प्रभास

‘राघव ने मुझे पाने के लिए शिव धनुष तोड़ा था, अब उन्हें रावण का घमंड तोड़ना होगा.’- क्रिती सनन

‘आज मेरे लिए मत लड़ना, उस दिन के लिए लड़ना, जब इतिहास में तुम्हारा नाम पढ़कर सम्मान से सिर झुक जाएंगे…लड़ोगे..तो आगे बढ़ो और गाड़ दो अहंकार की छाती में विजय का भगवा ध्वज’- प्रभास

‘ब्रह्मांड में जो भी पाने लायक है, तू पा चुका है..फिर भी तू राक्षस ही है…लक्ष्मी को पाले, नारायण हो जाएगा.’- सैफ अली खान

Adipurush Dialogue
Smriti Irani: दयाबेनचा व्हिडीओ शेअर करत स्मृती ईराणींचा विवाहित जोडप्यांना मजेदार सल्ला, म्हणाल्या...

टीझरच्या तुलनेत ट्रेलरमध्ये व्हीएफएक्स आणि एनिमेशनवर किती काम करण्यात आलंय हे सांगणं कठीण आहे. पहिल्या नजरेतच तुम्हाला अनेक सीनमध्ये व्हीएफक्सचा भरणा दिसेल. पण कलाकारांचे डायलॉग आणि बॅकग्राऊंड म्युझिकपुढे हे व्हीएफएक्स अतिरंजक वाटत नाहीत. सिनेमाचं बॅकग्राउंड म्युझिक आणि जय श्री रामचा नारा प्रेक्षकांचा जोश वाढवतात एवढं मात्र नक्की.

Adipurush Dialogue
Amruta Khanvilkar: जीव दंगला गुंगला रंगला असा..पिरमाची आस तू..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com