Adipurush Controversy: सैफच्या लूकवर मेकर्सचा मोठा निर्णय, कसा दिसणार आता सिनेमातील रावण? Saif Ali Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adipurush Update: Director Om Raut planning to change saif ali khan ravan look

Adipurush Controversy: सैफच्या लूकवर मेकर्सचा मोठा निर्णय, कसा दिसणार आता सिनेमातील रावण?

Adipurush Controversy: दिग्दर्शक ओम राऊतचा 'आदिपुरुष' सिनेमा गेल्या दीड एक महिन्यापासून चर्चेत आहे. याचा ट्रेलर जेव्हापासून रिलीज झाला तेव्हापासून सिनेमा वादात सापडलाय. सिनेमाच्या व्हीएफएक्सवर अनेकांनी बोट दाखवलं. तसंच,सिनेमाच्या कथेवर देखील लोक खट्टू झालेले दिसून आले आणि त्यानंतर बॉयकॉटची देखील मागणी करण्यात आली होती.

यानंतर मेकर्सनी या सिनेमाला जानेवारी ऐवजी जूनमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला. मेकर्सनी सिनेमात आपण काही बदल करणार असल्याचं देखील सांगितलं. आता बातमी आहे की सैफ अली खानच्या लूकमध्ये देखील थोडं वरखाली केलं जाईल,अर्थात रावणाचा लूक बदलणार असं सध्या चित्र दिसतंय. (Adipurush Update: Director Om Raut planning to change saif ali khan ravan look)

हेही वाचा: Aishwarya Rai: सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या एका फोटोवरनं खळबळ, थेट अभिनेत्रीला संस्कार शिकवू लागले लोक

'आदिपुरुष' सिनेमात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारत आहे. सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता तेव्हा सैफच्या लूकवरनं तर मोठा वाद पेटला होता. त्याच्या दाढी-मिश्या लोकांना खटकल्या होत्या.सोशल मीडियावर त्याला जोरदार विरोध केला गेला. आता बातमी आहे की मेकर्सनी याच्यावर देखील तोडगा शोधून काढलाय. ते आता सैफच्या दाढी-मिश्या व्हीएफएक्स च्या माध्यमातून हटावणार आहेत.

हेही वाच- Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

हेही वाचा: Arbaaz Khan: 21 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी कसं आहे अरबाजचं नातं; वयातील फरकावर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला

एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सैफच्या लूकवर जास्त काम करण्याची गरज असल्याचं दिग्दर्शक ओम राऊतनं सांगितलं आहे. आता व्हीएफएक्सच्या माध्यमातून ते अभिनेत्याचा लूक बदलणार आहेत. त्याची दाढी त्यातनं काढून टाकली जाईल. टीझरनंतर वाद सुरू झाला आणि त्यानंतर सिनेमात बदल करण्यासाठी तब्बल ३० करोड रुपये पुन्हा खर्च करणार असल्याचं बोललं जात आहे. अर्थात यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. फक्त दिग्दर्शक ओम राऊतने नुकतेच सोशल मीडियावर आपल्या सिनेमाची नवी रिलीज डेट सांगितली होती.

एक पोस्टर शेअर करत त्यानं लिहिलेलं-''आदिपुरुष हा केवळ एक सिनेमा नाही. तर प्रभू श्रीरामा प्रती असलेली लोकांची निस्सिम भक्ती आणि गौरवशाली इतिहास तसंच संस्कृतीविषयीचं प्रतिक आहे. प्रेक्षकांना एक अद्भूत अनुभव देण्यासाठी या कलाकृतीशी जोडल्या गेलेल्या लोकांना थोडा अधिक वेळ देण्याची गरज आहे. आदिपुरुष आता १६ जून,२०२३ रोजी रिलीज होणार आहे''.

सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊतनं लोकांनी दिलेल्या सूचनांचा आदर करत एका मुलाखतीत म्हटलं होतं की,''आमच्यावर विश्वास ठेवा. आमच्यासाठी आमचे प्रेक्षक खूप महत्त्वाचे आहेत,मोलाचे आहेत. त्यामुळे ते ज्या काही सुचना,मार्गदर्शन आम्हाला करत आहेत ते आम्ही लक्षात घेऊन नोट करुन ठेवत आहोत. आणि आम्ही आश्वासन देतो की जेव्हा सिनेमा १२ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होईल तेव्हा आम्ही कोणही नाराज नाही होणार याची काळजी घेतलेली असेल आमच्यावर विश्वास ठेवा,आम्ही हे निश्चित करू''.