अखेर ठरंल ! व्हॅलेनटाइनच्या मुहूर्तावर नेहा-आदित्यचं होणार लग्न

Aditya Narayan and Neha Kakkar to tie the knot on February 14
Aditya Narayan and Neha Kakkar to tie the knot on February 14
Updated on

मुंबई : बॉलिवूडची लाडकी गायिका नेहा कक्कर नेहमीच तिच्या लव्हअफेअर्समुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तर तीच्याविषयी चर्चांना उधाण येते. सध्या इंडियन आयडॉलच्या सेटवर असे काही किस्से घडतायत की पुन्हा एकदा ती चर्चेत आलीय. या सेटवर चक्क तिचं लग्नच ठरविण्यात आलंय आणि तेही एका ज्येष्ठ गायकाने त्यांच्या मुलासाठीच तिला लग्नाची मागणी घातली आहे. दुसरं तिसरं कोणी नाही तर, उदित नारायण यांनी त्यांचा मुलगा आदित्यसाठी नेहाला मागणी घातली आहे. आता लवकरच हे कपल लग्नबेडीत अडकणार आहे. 

नेहा कक्करला गायक उदित नारायण यांनीच आपल्या मुलासाठी लग्नाची मागणी घातलीय. उदित नारायण यांचा मुलगा आणि इंडियन आयडॉलचा निवेदक आदित्य नारायण याच्यासाठी उदित यांनी नेहाला मागणी घातली आहे. 'नेहा कक्करला मी सून म्हणून घरी घेऊन जाण्याचा विचार करतोय.' हे ऐकून नेहा शॉक झाली. तिला याची काहीच कल्पना नव्हती. यात आणखी भर म्हणून नेहा कक्करचे आई-वडिलही सेटवर येतात व आम्हाला आदित्य जावई म्हणून पसंत आहे असं सांगतात.

आता या दोघांच्या लग्नाची तारीखही ठरली आहे. 14 फेब्रुवारीला म्हणजेच 'व्हॅलेंटाइन डे' ला नेहा आणि आदित्यचं लग्न होणार आहे. ही माहिती सोनी टीव्हीच्या ट्विटर अकाउंटवर '14 तारीख राखून ठेवा' असं लिहिलं आहे. यामध्ये नेहा आणि आदित्यच्या डान्सचा एक व्हिहीओही आहे. त्यामध्ये हे दोघं एक रोमॅंटिक डान्स करताना दिसत आहेत. खरंतर हा 'इंडियन आयडॉल 11' या कार्यक्रमाचाच एक भाग आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#GoaBeach  Out on 10th feb  . . #TonyKakkar #NehaKakkar #AnshulGarg #AdityaNarayan #KatKritian #DesiMusicFactory

A post shared by Neha Kakkar (@nehakakkar) on

पण, सोशल मीडियावरही यांच्या लग्नाची जोरदार चर्चा पाहायला मिळतेय. नेहा आणि आदित्य सध्या त्यांच्या काही मित्रांसोबत गोव्यामध्ये फिरताना दिसत आहेत. त्याचे फोटोही व्हायरल होताना दिसत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com