
बॉलिवूडची एक आवडती जोडी म्हणजे अक्षय कुमार आणि कतरिना कैफ.चा 'सूर्यवंशी' हा सिनेमा येतोय. पण, या सिनेमाच्या सेटवर कतरिना कचरा काढताना दिसली. हा व्हिडीओ एकदा पाहाच !
मुंबई : नव्या वर्षासह बॉलिवू़डमध्ये मनोरंजनाची चांगलीच मेजवानी प्रेक्षकांना मिळतेय. अऩेक चित्रपट या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. बॉलिवूडची एक आवडती जोडी म्हणजे अक्षय कुमार आणि कतरिना कैफ. या दोघांनी अनेक सुपरहिट सिनेमे एकत्र केले. आता ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांचा 'सूर्यवंशी' हा सिनेमा येतोय. पण, या सिनेमाच्या सेटवर कतरिना कचरा काढताना दिसली. हा व्हिडीओ एकदा पाहाच !
बापरे काय ही फॅशन ? नुसरत भरुचाला नेटकऱ्यांचा सवाल
कतरिना आणि अक्षय बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसणार आहेत. "तिस मार खान'' हा सिनेमातून ते दोघं एकत्र दिसले होते. 'सूर्यवंशी' च्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकत्र दिसेल. तशी त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री लोकांना पसंत आहेच. शिवाय ऑफस्क्रीनही अक्षय आणि कतरिना हे चांगले मित्र असल्याने एकमेकांसोबत मजा करताना दिसतात. त्याचाच प्रत्यय एका व्हिडीओमधून आला जो अक्षयने शेअर केला आहे.
Spotted : The newest #SwachhBharat brand ambassador on the sets of #Sooryavanshi #BTS pic.twitter.com/NpzQJUaKLw
— Akshay Kumar (@akshaykumar) February 3, 2020
या व्हिडीओमध्ये कतरिना 'सूर्यवंशी' च्या सेटवर कचरा काढताना दिसतेय. ‘सूर्यवंशी’ हा रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्समधील सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या सेटवर काही मजा-मस्ती सुरु आहे आणि त्याचा एक व्हिडीओ अक्षयने शेअर केला. कतरिना कचरा काढत असलेल्या या व्हिडीओला कॅप्शन देताना अक्षयने लिहिले, ''स्वच्छ भारत अभिनयासाठी नवा ब्रॅंड एम्बेसेडर मिळाला.'' असं मजेशीर कॅप्शन अक्षयने दिलं आहे.
'अरे सासूसोबतच काय पोस देतोस ?' नेटकऱ्यांचा कार्तिकला सवाल
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कतरिनाचं कौतुक केलं आहे तर काहींनी 'झाडूवाली बाई' अशी खोड काढली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहेत. 'सूर्यवंशी' येत्या 27 मार्चला चित्रपटगृहात दाखल होईल.