
काही दिवसांपासून आदित्यचे लग्नसोहळ्यापूर्वीचे कार्यक्रम आणि रितीरिवाज सुरु आहेत. या दरम्यान आदित्यचा एक व्हिडिओ व्हायल होतोय ज्यामध्ये तो स्वागताच्या वेळी नाचताना दिसतोय.
मुंबई- प्रसिद्ध गायक आणि टीव्ही होस्ट आदित्य नारायण आज म्हणजेच १ डिसेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकतोय. अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये असलेल्या गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत तो सात फेरे घेणार आहे. काही दिवसांपासून त्याचे लग्नसोहळ्यापूर्वीचे कार्यक्रम आणि रितीरिवाज सुरु आहेत. या दरम्यान आदित्यचा एक व्हिडिओ व्हायल होतोय ज्यामध्ये तो स्वागताच्या वेळी नाचताना दिसतोय.
हे ही वाचा: लॉकडाऊन दरम्यान वाढल्या अभिषेकच्या 'या' भूमिकेतील अडचणी, चूक झाल्यास झाली असती मोठी गडबड
शनिवारी आदित्यची तिलक सेरेमनी झाली होती. ज्यानंतर रविवारी मेहेंंदी आणि सोमवारी हळद होती. १ डिसेंबर म्हणजे आज मंगळवारी दोघेही विवाहबंधनाच अडकणार आहेत. आदित्यचा हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो त्याच्या लग्नसोहळ्यातील एका कार्यक्रमाचा आहे. यामध्ये आदित्य देखील नाचताना दिसतोय.
अभिनेत्री मेघना कौशिकने तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरीवर आदित्यचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यामध्ये तो डान्स करतोय. हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिलंय, डीजे विथ ढोल आणि अशा प्रकारे यात नवरदेवाची एंट्री झाली. हा व्हिडिओ आदित्यने देखील त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे.
आदित्य आणि श्वेता यांचे तिलक सेरेमनीचे फोटो सोशल मिडियावर झळकले होते. या फोटोंमध्ये आदित्यच्या कपाळावर तिलक लावलेला आणि गळ्यात हार घातलेला दिसतोय. काही महिन्यांपूर्वीच आदित्यने श्वेतासोबतच्या रिलेशनशिपचा खुलासा केला होता. दोघांची लव्हस्टोरी 'शापित' सिनेमाच्यावेळी तयार झाली. या सिनेमातील एक गाणं आदित्यने एकदा त्यांचा फोटो शेअर करत लिहिलं होतं. कहा था ना ''कभी ना कभी तो मिलेंगे हम को यकीन है'' असं म्हणत त्याने श्वेता आणि त्याचा फोटो पोस्ट केला होता. ज्यावर चाहत्यांचा खूप प्रतिसाद मिळाला.
aditya narayan shweta agarwal wedding singer dance video