
मुलीच्या जन्मानंतर आदित्य नारायणनं घेतला मोठा निर्णय;चाहते नाराज
गायक,सूत्रसंचालक म्हणून काम करीत आदित्य नारायणनं(Aditya Narayan) मनोरंजन सृष्टीत आपलं नाव कमावलं. ज्येष्ठ गायक उदित नारायण(Udit Narayan) यांचा मुलगा म्हणून सुरुवातीला त्याला ओळखलं जायचं. पण आपल्या खुमासदार,खुसखुशीत सूत्रसंचालनानं त्यानं अनेकांची मनं जिंकत आपली ओळख निर्माण केलीच. नुकताच तो बाबा झाला असतानाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत असताना अचानक त्याच्या चेहऱ्यावरचं हसू का बरं त्याच्यापासून दुरावंलय. तर हो,बातमीच तशी आहे. गेली अनेक वर्ष 'सारेगमप' या संगीत रिअॅलिटी शो चं सूत्रसंचालन करणाऱ्या आदित्यनं यापुढे आपण येणाऱ्या 'सारेगमप' शो चा भाग नसू अशी घोषणा इ्स्टाग्रामवर एका पोस्टच्या माध्यमातून केली.
त्यां त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय,''अत्यंत जड अंतःकरणाने मी हे सांगत आहे की मी 'सारेगमप' या कार्यक्रमाचा यापुढे भाग नसेन. या कार्यक्रमानं मला माझी ओळख दिली. वयाच्या १८ व्या वर्षापासनं अगदी तरुण वयात मी या शोचा भाग होतो. आज मी पती आणि वडिल अशा दोन्ही भूमिका निभवतोय. १५ वर्ष,९ सीझन्स, ३५० एपिसोड्स. वेळ भुरकन उडून गेला आहे. पण मला ही संधी देणाऱ्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानत आहे''. आदित्यच्या या पोस्टला वाचून त्याचे चाहते मात्र दुखावले आहेत. संगीत दिग्दर्शक श्रेयस पुराणिकनं कमेंट सेक्शनमध्ये लिहिलंय की,'नानू साहेब ये क्या न्यूज दी आपने'. निया शर्मानं लिहिलंय,'तुला खुप यश मिळो'. संगीतकार विशाल दादलानीनं देखील आदित्यच्या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यानं लिहिलंय,'मै क्या बोलू? तुझी आणि माझी सारेगमप कार्यक्रमाची जर्नी एकत्र सुरू झाली,मला वाटतं तु तुझा हा विचार बदलशील.तुला संगीत क्षेत्रात काम करायचंय,तिथे वेळ द्यायचाय,म्हणून टी.व्ही शो साठी तुझ्याकडे वेळ नाही. जा आदि,जिले आपनी जिंदगी. लव्ह यू!'
हेही वाचा: मराठी मालिका विश्वातील टॉप 5 स्त्री व्यक्तिरेखा; नंबर 1 वर कोण?
गेल्या वर्षीच आदित्यने आपण टेलीव्हिजन शो सोडणार आहोत याची कल्पना दिली होती. त्यानं म्हटलं होतं,''आता वेळ आली आहे मोठं काहीतरी करायची. मला जे करायचं आहे ते मी आता करेन, हो पण आधीच्या सर्व कमिटमेंट्स पूर्ण केल्यावरच''. त्या निर्णयावर खरा उतरत आता अखेर आदित्य नारायणने यापुढे टी.व्ही शो न करण्याचं जाहिर केलं आहे.
Web Title: Aditya Narayan Taking Big Decision After Become A
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..