Aditya Roy Kapur: आदित्यला व्हायचं होतं क्रिकेटर, पण नशीब फिरलं आणि..

अभिनेता आदित्य रॉय कपूरचा आज वाढदिवस, जाणून घ्या ही खास बात..
Aditya Roy Kapur wanted to make his identity as a cricketer, but luck made him an actor
Aditya Roy Kapur wanted to make his identity as a cricketer, but luck made him an actorsakal

aditya roy kapur: २०१३ मध्ये रिलीज झालेल्या 'आशिकी 2' या चित्रपटाने अनेकांच्या मनावर राज्य केले होते. हा चित्रपट इतका हिट झाला की त्यातल्या ' राहुल जयकर' म्हणजेच आदित्य रॉय कपूर ने अनेक तरूणींच्या मनावर राज्य केले. त्याच आदित्य रॉय कपूरचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊया एक खास बात..

(Aditya Roy Kapur wanted to make his identity as a cricketer, but luck made him an actor)

Aditya Roy Kapur wanted to make his identity as a cricketer, but luck made him an actor
Rhea Chakraborty: हिला लाज वाटत नाही का? करणसोबतच्या पार्टी नंतर रिया चक्रवर्ती ट्रोल

बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारा आदित्य रॉय कपूर हा चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. आदित्य रॉय कपूर यांचा १६ नोव्हेंबर १९८५ मध्ये मुंबईमध्ये झाला. तो 37 वर्षांचा झाला आहे. आदित्य रॉय कपूर जरी आता त्याची ओळख एक अभिनेता म्हणून असली तरी त्याला खरं तर त्याला क्रिकेटर व्हायचे होते. त्याच्या फार कमी चाहत्यांना हे माहीत असेल.

आदित्य रॉय कपूरला लहानपणापासून अभिनयाची विशेष ओढ नव्हती. यामुळे त्याला क्रिकेटर म्हणून आपला ठसा उमटवायचा होता. शालेय जीवनात तो फक्त क्रिकेटर होण्यावर लक्ष केंद्रित करत असे. त्याची आई त्याच्या शाळेत नाटक दिग्दर्शित करायची. यानंतर हळूहळू अभिनयाची आवड वाढू लागली. यानंतर त्यांनी अभिनयातील सर्व धडे आईकडून शिकून घेतले. आदित्यचे भाऊ सिध्दार्थ आणि कुणाल रॉय कपूर हे देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत.

आदित्य रॉय कपूरने आपल्या चित्रपट कारकिर्दीत 'गुजारिश', 'फितूर', 'डियर जिंदगी', 'ये जवानी है दिवानी' यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'आशिकी 2' या गाजलेल्या चित्रपटासोबतच आदित्यने 'साइड हीरो' आणि 'कॅप्टन' सारख्या वेब सीरिजमध्येही भूमिका केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com