esakal | अदनान सामीच्या घरी लहान पाहुण्याचं आगमन, शेअर केला पहिला फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

adnan sami

अदनानच्या घरी एक लहान पाहुण्याचं आगमन झालेलं आहे. आता तुम्हाला उत्सुकता असेल हा नवा पाहुणा कोण आहे त्यासाठी पुढे वाचा- 

अदनान सामीच्या घरी लहान पाहुण्याचं आगमन, शेअर केला पहिला फोटो

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक अदनान सामी नेहमीच चर्चेत असतो. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन त्याची चर्चा होत असते. नुकतंच अदनान सामीने त्याच्या चाहत्यांसोबत एक खुशखबर शेअर केली आहे. अदनानच्या घरी एक लहान पाहुण्याचं आगमन झालेलं आहे. आता तुम्हाला उत्सुकता असेल हा नवा पाहुणा कोण आहे त्यासाठी पुढे वाचा- 

हे ही वाचा: घर आणि पुस्तकं गेली पूरात वाहून, सोनू सूद म्हणाला 'ताई अश्रू पूस..'

अदनान सामी सोशल मिडीयावर चांगलाच ऍक्टीव्ह असतो. तो नेहमीचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. याशिवाय अनेक सामाजिक मुद्द्यांवरही तो त्याची प्रतिक्रिया देत असतो. आता नुकतंच त्याने सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे.

अदनानने त्याच्या या पोस्टमध्ये या लहान पाहुण्याचा पहिला फोटो शेअर केला आहे. हा लहान गोड पाहुणा म्हणजे कुत्र्याचं एक लहान गोंडस पिल्लू आहे. या गोंडस कुत्र्याच्या पिल्लूचा फोटो शेअर करत अदनानने लिहिलंय, 'घोषणा, गर्वाने माझ्या घरातील नवीन पाहुण्याची मी तुमची ओळख करुन देत आहे.' या पोस्टसोबत त्याचा एक गोंडस फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोसोबत अदनानने लहान पाहुण्याचं नाव देखील सांगितलं आहे.

अदनाने त्याच्या या पिल्लाचं नाव एल चापो असं ठेवलंय. अदनानच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत. अदनानच्या चाहत्यांनी या नवीन पाहुण्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींकडे त्यांचे पाळीव कुत्रे आहेत. कित्येक सेलिब्रिटी तर या प्राण्यांना त्यांच्या मुलाप्रमाणेच समजतात. प्रियांका चोप्रा, दिशा पटानी, अनुष्का शर्मा यांच्या पाळीव कुत्र्यांसोबतंच सुशांतचा फज देखील सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत असतो.     

adnan sami introduced new family member el chapo his pet dog  

loading image
go to top