esakal | 'माहित नाही परत कधी येईन'; अद्वैत दादरकरचा इन्स्टाग्रामला रामराम!
sakal

बोलून बातमी शोधा

'माहित नाही परत कधी येईन'; अद्वैत दादरकरचा इन्स्टाग्रामला रामराम!

'माहित नाही परत कधी येईन'; अद्वैत दादरकरचा इन्स्टाग्रामला रामराम!

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'अग्गंबाई सूनबाई' Aggabai Sunbai मालिकेत सोहमची भूमिका साकारणारा अभिनेता अद्वैत दादरकरने Adwait Dadarkar इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवरील अकाऊंट डिअॅक्टिव्हेट करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या अद्वैतने अचानक असा निर्णय का घेतला, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. अद्वेतने पोस्ट लिहित चाहत्यांना याबद्दल सांगितलं. (Adwait Dadarkar quits Instagram says do not know when I will come back)

'सोशल मीडियाचा कंटाळा आला आहे. त्यामुळे इन्स्टाग्राम डिअॅक्टिव्हेट करत आहे. कदाचित काही काळासाठी... माहित नाही परत कधी येईन. मी ओके आहे. त्यामुळे काय झालं वगैरे विचारायला फोन करू नये', अशी पोस्ट अद्वैतने लिहिली आहे.

हेही वाचा: 'ही पोरी कोणाची?'; मराठी कपलचा सुपरहिट डान्स व्हिडीओ व्हायरल

अद्वैतने 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत सौमित्रची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर तो आता 'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेत सोहमची भूमिका साकारतोय. या मालिकेत त्याच्यासोबत गिरीश ओक, निवेदिता सराफ आणि उमा पेंढारकर प्रमुख भूमिका साकारत आहेत.

loading image