esakal | 'ही पोरी कोणाची?'; मराठी कपलचा सुपरहिट डान्स व्हिडीओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

nitish shweta

'ही पोरी कोणाची?'; मराठी कपलचा सुपरहिट डान्स व्हिडीओ व्हायरल

sakal_logo
By
स्वाती वेमूल

इन्स्टाग्राम हे सध्या अनेकांचं आवडतं अॅप आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी या अॅपचा वापर करत असून त्यावर विविध फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतात. त्यापैकी काही फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल होतात आणि चाहत्यांच्या पसंतीस पडतात. अशाच एका मराठी सेलिब्रिटी कपलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'लागीरं झालं जी' Lagir Zala Ji या मालिकेत आज्याची भूमिका साकारणारा अभिनेता नितीश चव्हाण Nitish Chavan आणि अभिनेत्री श्वेता खरात Shweta Kharat यांचा हा डान्स करतानाचा व्हिडीओ आहे. (lagir zala ji fame nitish chavan and shweta kharat dance video viral)

'गल्यानं साखली सोन्याची, ही पोरी कोणाची' या गाण्यावर हे दोघं डान्स करताना दिसत आहे. श्वेता आणि नितीश दोघंही खूप चांगले डान्सर्स असून त्यांचा हा डान्स नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. या डान्समधील दोघांची केमिस्ट्रीसुद्धा चाहत्यांना भावली. नितीश सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून त्याने काही दिवसांपूर्वीच 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटातील गाण्यावर डान्स केला होता. नितीशचा तो व्हिडीओदेखील लोकप्रिय ठरला होता.

हेही वाचा: करीना-सैफच्या दुसऱ्या मुलाचं ठरलं 'हे' नाव?

झी मराठी वाहिनीवरील 'लागीरं झालं जी' ही मालिका बंद पडल्यानंतर नितीश कोणत्या मालिकेत झळकला नाही. मात्र सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तो चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात आहे. तर श्वेता खरात सध्या 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेत भूमिका साकारत आहे.

loading image