'आदिपुरुष' नंतर सैफ अली खानची 'तांडव' वेब सिरीज अडचणीत?

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 19 December 2020

.सैफ अली खान त्याच्या भूमिकेविषयी अशा प्रकारच्या वादात अडकण्याची हरी पहिली वेळ नाहीये. याआधी देखील 'आदिपुरुष' सिनेमाच्या निमित्ताने केलेल्या वक्तव्यावरून मोठा बवाल झाला होता.

मुंबई : अभिनेता सैफ अली खानच्या 'तांडव' या वेब सीरीजचा टिझर नुकताच रिलीज झाला. या सिरीजमधील नवाब सैफचा डॅशिंग लूक पाहुन चाहते त्याच्यावर फिदा झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच सैफ एका वक्तव्यामुळे चर्चेत आला होता. तेव्हा हा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला नव्हता. मात्र आताची परिस्थिती पाहता 'तांडव' वेब सीरीजमुळे सैफ अली खान पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा: बिग बी म्हणाले, 'आयुष्यात यापेक्षा मोठं टॉर्चर होऊच शकत नाही'    

सैफ अली खान 'तांडव' या वेबसिरीजमधय उत्तर भारतातील एका राजकीय नेत्याची भूमिका साकारतोय आणि स्पॉटबॉयच्या म्हणण्यानुसार ही वेब सीरिज एका राजकीय नेत्याच्या आयुष्यावर आधारित आहे. एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खान म्हणाला की, डार्क कैरेक्टर करायला मला आवडतं कारण त्यात फ्लेक्सिबल होण्याची संधी मिळते.

या वेब सीरीजमध्ये, राजकारणी सत्तेसाठी काय करू शकतात, सत्तेसाठी कोणत्या पातळीला जाऊ जातात. आणि सत्ता मिळवण्यासाठी लोकांचा कसा वापर करु शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.. याच कारणामुळे सैफ अली खानची ही वेब सीरीज वादात अडकण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय..सैफ अली खान त्याच्या भूमिकेविषयी अशा प्रकारच्या वादात अडकण्याची हरी पहिली वेळ नाहीये. याआधी देखील 'आदिपुरुष' सिनेमाच्या निमित्ताने केलेल्या वक्तव्यावरून मोठा बवाल झाला होता. त्यावेळी सैफ मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील झाला होता.  सैफ अली खान नुकत्याच त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आला होता. सैफ आगामी 'आदिपुरुष' सिनेमात रावणाची भूमिका साकारतोय.. हा सिनेमा रामायणावर आधारीत आहे.

या सिनेमाच्या निमित्ताने 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत सैफने सीताहरण संबंधित केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. रामाचा भाऊ लक्ष्मणने रावणाची बहिण शुर्पणकेचं नाक कापलं होतं. त्याचाच सूड उगवण्यासाठी सीतेचं अपहरण करण्यात आलं आणि रामासोबत युद्ध झालं, असं आम्ही दाखवणार असल्याचं वक्तव्य सैफ अली खानने केलं होते. त्यानंतर त्याच्यावर टिकेची झोड उठल्याने त्याला माफी देखील मागावी लागली होती.   

after adipurush more trouble awaits saif ali khan in tandav  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after adipurush more trouble awaits saif ali khan in tandav