बिग बी म्हणाले, 'आयुष्यात यापेक्षा मोठं टॉर्चर होऊच शकत नाही'

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 19 December 2020

अमिताभ यांनी केलेली अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. बिग बींनी चक्क गुलाबजाम आणि रसगुल्ला या गोड पदार्थांचा फोटो पोस्ट केला आहे.

मुंबई- बॉलिवू़डचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टीव्ह असतात. मग ते सोशल मिडियावरचे फोटो, व्हिडिओ असो किंवा मग ब्लॉग्स. त्यांच्यांशी संबंधित प्रत्येक गोष्ट चर्चेतंच असते. यावेळी अमिताभ यांनी केलेली अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. बिग बींनी चक्क गुलाबजाम आणि रसगुल्ला या गोड पदार्थांचा फोटो पोस्ट केला आहे.

हे ही वाचा: रेमो डिसूजाला मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, सोशल मिडियावर पोस्ट करत म्हणाला...

बिग बींनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या एका हातात गुलाबजाम तर दुसऱ्या हातात रसगुल्ला असल्याचा एक फोटो पोस्ट केलाय. हा फोटो पोस्ट करताना त्यांनी लिहिलंय,  “जेव्हा गोड पदार्थ खाणं थांबवलं तेव्हा या शूटिंगवाल्यांनी माझ्या हातात गुलाबजाम आणि रसगुल्ला दिला. आणि म्हणतायेत या पदार्थांची चव सांगणारं एक्सप्रेशन द्या. आयुष्यात यापेक्षा मोठं टॉर्चर होऊच शकत नाही.” असं मजेशीर कॅप्शन देत अमिताभ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. बिग बींची ही मजेशीर पोस्ट सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतेय.

काही दिवसांपूर्वी बिग बी कानांच्या कवितेमुळे चर्चेत होते. या कवितेद्वारे त्यांनी आपल्या कानांचं मनोगत सांगण्याचा प्रयत्न केला होता. कान जर खरंच बोलू लागले तर ते काय बोलतील? स्वत:च्या समस्या कशा सांगतील? हे त्यांनी या कवितेद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला. “मैं हूँ कान… हम दो हैं… जुड़वां भाई…, लेकिन हमारी किस्मत ही ऐसी है, कि आज तक हमने अपने दूसरे, भाई को देखा तक नहीं” अशी कविता पोस्ट करत त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. त्यांची ही कविता देखील चाहत्यांना खूप आवडली. 

amitabh bachchan stopped eating sweets photo viral  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amitabh bachchan stopped eating sweets photo viral