esakal | 'बिग बॉस 13' नंतर पारस-माहिरा बनले नवरा नवरी..सोशल मिडीयावर झळकले फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

 'बिग बॉस 13' नंतर पारस-माहिरा बनले नवरा नवरी..सोशल मिडीयावर झळकले फोटो

बिग बॉस 13 चे स्पर्धक पारस छाब्रा आणि माहिरा शर्मा पुन्हा एकत्र  आलेत..हे दोघंही एकत्र एक व्हिडीओ शूट करतायेत..यात माहिरा आणि पारस यांनी क्रिश्चन नवरा- नवरीचा वेश परिधान केलाय.

'बिग बॉस 13' नंतर पारस-माहिरा बनले नवरा नवरी..सोशल मिडीयावर झळकले फोटो

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बिग बॉस 13 चे स्पर्धक पारस छाब्रा आणि माहिरा शर्मा पुन्हा एकत्र  आलेत..हे दोघंही एकत्र एक व्हिडीओ शूट करतायेत..यात माहिरा आणि पारस यांनी क्रिश्चन नवरा- नवरीचा वेश परिधान केलाय.

या म्युझिक व्हिडीओच्या शूटींग दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत..या फोटोंमध्ये माहिरा सफेद रंगाच्या गाऊनमध्ये तर पारस काळ्या रंगाच्या कोटमध्ये दिसून येतोय..या दोघांनी शूटींग दरम्यानचा एक व्हिडीओही पोस्ट केलाय ज्यात दोघंही एकत्र येऊन खूप खूष आहेत..

माहिरा शर्माने हा व्हिडीओ तिच्या इन्टाग्राम अकाऊंटववर पोस्ट करत म्हटलंय, 'आता काहीतरी मोठं घडणारे..तुम्ही सगळे यासाठी उत्सुक आहात ना? तर दुसरीकडे पारसनेही शूटींगचे काही खास फोटो शेअर करत 'वन वुमेन आर्मी' आणि 'काहीतरी नवीन पाहिरा' असं म्हटलंय...

कॉम्प्युटर शिकवायच्या नावाने यायचा आणि मुलींशी करायचा असं काही...

बिग बॉस 13' या शो मधील पारस-माहिराची मैत्री चर्चेचा विषय बनली होती..मात्र ही मैत्री नंतर प्रेमात बदलताना दिसून आली..या दोघांनी अनेकदा एकमेकांवरचं प्रेम व्यक्त केलं असलं तरी कुठलीच गोष्ट जाहीरपणे ठाम सांगितली नाही..माहिराने नुकतीच पारस आणि त्याची गर्लफ्रेंड आकांक्षा यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया दिली. ही खूपंच चूकीची गोष्ट आहे की पारस आणि आकांक्षाच्या ब्रेकअपसाठी मला जबाबदार धरलं जातंय..मी एक गोष्ट स्पष्ट सांगते की, जर या दोघांच्या ब्रेकअपसाठी मी जबाबदार असते तर आज मी पारसची गर्लफ्रेंड असते..मात्र आम्ही आजही एकमेकांचे चांगले मित्र आहोत.. जेव्हा मैत्री आणि रिलेशन बाबत बोलायची वेळ येते तेव्हा याबाबत मी नेहमीच स्पष्ट बोलणारी व्यक्ती असल्याचं माहिरा सांगते...

after bigg boss 13 finale mahira sharma and paras chhabra music video pictures viral

loading image
go to top