esakal | कॉम्प्युटर शिकवायच्या नावाने यायचा आणि मुलींशी करायचा असं काही...
sakal

बोलून बातमी शोधा

कॉम्प्युटर शिकवायच्या नावाने यायचा आणि मुलींशी करायचा असं काही...

कॉम्प्युटर शिकवायच्या नावाने यायचा आणि मुलींशी करायचा असं काही...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : महापालिकेच्या महापे येथील शाळेत संगणक शिकवणाऱ्या शिक्षकाने 14 पेक्षा जास्त मुलींचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 31 वर्षीय आरोपी शिक्षक लोचन परुळेकर याच्याविरोधात तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. महापालिकेच्या शाळेतील मुलींसोबत घडलेल्या या कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

मोठी बातमी - फक्त 'हे' कानातले घाला मग मुलींनो तुमची छेड काढण्यास कुणीही धजावणार नाही...

महापालिकेच्या शाळांमध्ये सीएसआर फंडांतून अनेक खासगी कंपन्या विविध प्रकारे मदत करत असतात. त्याप्रमाणे एल ऍण्ड टी या संस्थेने सीएसआर फंडातून महापे येथील शाळेत 15 संगणक मोफत दिले होते. संगणक शिकवण्यासाठी सानपाडा येथील "वात्सल्य ट्रस्ट'मार्फत प्रशिक्षकाची तरतूदही एल ऍण्ड टी कंपनीने केली होती. वात्सल्य ट्रस्टमार्फत नियुक्त करण्यात आलेला प्रशिक्षक लोचन हा नेहमी शाळेत सहावी ते आठवीच्या मुलांना संगणक शिकवण्यासाठी शाळेत जात होता. संगणक शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींशी विविध कारणांनी तो लगट करण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला लोचनची कृत्ये मुलींच्या लक्षात आली नाहीत. मात्र, रोजच असा प्रकार सुरू राहिल्यावर अखेर मुलींनी शाळेतील शिक्षकांना त्याबाबत माहिती दिली.

मोठी बातमी - मॉलमध्ये घुमली दीड वर्षीय चिन्मयची किंचाळी, आई बाबा पोहोचेपर्यंत उशीर झालेला...

शिक्षकांनीही लोचनच्या वागणुकीवर लक्ष ठेवून त्याबाबत खातरजमा करून घेतली. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाला संबंधित प्रशिक्षकाची कृत्ये कळवल्यावर शिक्षण विभागाने तत्काळ वात्सल्य ट्रस्टला त्याच्यावर कारवाई करण्याचे पत्र दिले. महापे शाळेतील शिक्षिकेने लोचनविरोधात 15 फेब्रुवारीला तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर त्याला तत्काळ अटक करण्यात आली.

navi mumbai obscene behavior with students case registered against computer teacher  

loading image
go to top