कर्करोगावरील उपचारानंतर सोनाली बेंद्रे आता लवकरच भारतात

वृत्तसंस्था
रविवार, 2 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : अभिनेत्री सोनाली बेंद्रे गेल्या चार महिन्यांपासून कर्करोगावर उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये गेली होती. न्यूयॉर्कमध्ये उपचार पूर्ण केल्यानंतर आता सोनाली बेंद्रे लवकरच मायदेशी परतणार आहे. याबाबतची माहिती सोनाली बेंद्रेने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 

सोनाली बेंद्रेला कर्करोगाचे निदान झाल्यानंतर तिने पुढील उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये गेली होती. न्यूयॉर्कमध्ये उपचार पूर्ण झाल्याची माहिती इन्स्टाग्रामवर दिली आहे. त्यामध्ये तिने सांगितले, की मी भारतात परतत आहे. तिथेच माझे मन आहे. मला यामुळे अत्यंत आनंद होत आहे. हा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. मात्र, मी प्रयत्न करत आहे, की माझे कुटुंबिय आणि मित्रांना परत पाहणे हे माझ्यासाठी अत्यंत आनंददायक आहे. ही बाब मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. जे मला आवडते ते मी करेन, असेही तिने सांगितले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Cancer Treatment Sonali Bendre will be Return in India