जेलमधून बाहेर आल्यानंतर हर्ष लिंबाचिया पहिल्यांदा पोस्ट करत म्हणाला, ''जेव्हा आम्ही एकत्र..''

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 1 December 2020

काही दिवसांपूर्वी भारती सिंहने देखील जामीन मिळाल्यानंतर शूटिंगबाबतची पहिली पोस्ट केली होती त्यांनतर आता जेलमधून बाहेर आल्यानंतर हर्षने त्याच्या सोशल मिडियावर पहिली पोस्ट केली आहे.

मुंबई- प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष लिम्बाचियाला काही दिवसांपूर्वीच ड्रग्स प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. त्यानंतर दोघांनाही कोर्टाने जामीन मंजूर केला. काही दिवसांपूर्वी भारती सिंहने देखील जामीन मिळाल्यानंतर शूटिंगबाबतची पहिली पोस्ट केली होती त्यांनतर आता जेलमधून बाहेर आल्यानंतर हर्षने त्याच्या सोशल मिडियावर पहिली पोस्ट केली आहे.

हे ही वाचा: दीपिका पदूकोणला भेटायला पोहोचलेल्या रणवीर सिंहच्या फॅशन सेन्सची पुन्हा झाली चर्चा  

हर्ष लिम्बाचियाने त्याच्या इंस्टाग्रामवर भारती सिंह सोबतचे ३ फोटो शेअर केले आहेत आणि लिहिलंय, ''जेव्हा आम्ही दोघं एकत्र सोबत असतो तेव्हा इतर काहीही आमच्यासाठी महत्वाचं नसतं.'' हर्षच्या या पोस्टवर अनेक टीव्ही सेलिब्रिटींच्या कमेंट्स येत आहेत. टीव्ही इंडस्ट्रीतील अनेकजण भारती आणि हर्षचं समर्थन करत आहेत. भारती आणि हर्षला अटक केल्यानंतर बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींच्या रिऍक्शन समोर आल्या होत्या ज्यातील बरेच सेलिब्रिटी हैराण होते.

तर दुसरीकडे भारती सिंहला बहीण मानणारा तिचा सहकलाकार कॉमेडियन कृष्णा अभिषेकने भारतीला खुलेआम समर्थन दिलं आहे. त्याने म्हटलंय, ''त्याला या जगाची काहीही पडलेली नाही. मात्र कोणतीही वेळ आली तरी तो भारतीच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील.'' इतकंच नाही तर या ड्रग्स प्रकरणानंतर भारतीला 'द कपिल शर्मा शो' मधून बाहेरचा रस्ता दाखवल्याची चर्चा होती मात्र यावरंही कृष्णाने प्रतिक्रिया दिली. कृष्णा आणि किकू शारदा यांनी ही अफवा असल्याचं म्हटलं आहे. चॅनल अशा कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचले नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.   

after coming out of jail haarsh limbachiyaa did the first post  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after coming out of jail haarsh limbachiyaa did the first post