‘द्रोण’ फ्लॉप झाला आणि चित्रपट मिळायचे झाले बंद; अभिषेकची ट्विटमधून नवी माहिती

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 7 October 2020

‘द्रोण’ हा चित्रपट २००८मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिषेक बच्चन, प्रियांका चोप्रा, केके मेनन आणि इतर कलाकार मुख्य भूमिकेत होते. अभिषेकने चित्रपटात आदित्य हे पात्र साकारले होते. पण हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरला होता.

मुंबई - ज्युनिअर बच्चन हे त्यांच्या एका नव्या ट्विटमुळे भलतेच चर्चेत आले आहेत. आपण जो चित्रपट केला तो फ्लॉप झाल्यानंतर आपल्यापुढील अडचणी वाढल्याचे म्हटले आहे. कलाकाराच्या आयुष्यात चढउतार येतच राहतात. यशाचा मार्ग मिळण्याअगोदर त्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. असे अभिषेकने म्हटले आहे. तो याप्रकारच्या ट्विटच्या माध्यमातून नेमकं कुणाला काही सांगु पाहतोय हे नक्की.  यावरुन आणखी एका वेगळ्या विषयावर चर्चा सुरु झाली आहे.

‘द्रोण’ हा चित्रपट २००८मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिषेक बच्चन, प्रियांका चोप्रा, केके मेनन आणि इतर कलाकार मुख्य भूमिकेत होते. अभिषेकने चित्रपटात आदित्य हे पात्र साकारले होते. पण हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरला होता. ‘द्रोण’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर माझ्याकडून पुढील चित्रपट काढून घेतल्याचे अभिषेकने सांगितले आहे. अभिषेकने काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अनलॉकच्या ५व्या टप्प्यात चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी देताच ट्विट करत आनंद व्यक्त केला होते. पण या ट्विटमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

आयुष्यमानकडून मिळाला शिकण्याचा नाविन्यपूर्ण अनुभव ; राधिका आपटे

एका यूजरने अभिषेकला ‘द्रोण चित्रपटानंतर पुढचे चित्रपट कसे मिळाले?’ असा प्रश्न विचारला होता. यावर अभिषेकने उत्तर दिले आहे. त्यात तो म्हणतो, ‘मला द्रोण चित्रपटानंतर एकही चित्रपट मिळाला नाही. माझ्याकडून काही चित्रपट काढूनही घेण्यात आले आणि या चित्रपटानंतर चित्रपट मिळवणे देखील माझ्यासाठी कठीण झाले. पण आपण सर्वजण नेहमी आशेवर जगतो आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करतो.

 'मिर्झापूर २' चा ट्रेलर रिलीज,'बदले की आग मै जलेगा मिर्झापूर'

यश अपयशाच्या गोष्टींकडे अभिषेकने लक्ष वेधले आहे. त्याविषयी तो असे सांगतो की,प्रत्येक बॉलिवूड कलाकाराच्या करिअरमध्ये चढ उतार हे येतच असतात. कधी त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतात तर कधी त्यांचे चित्रपट फ्लॉप ठरतात. या यादीमध्ये अभिषेक बच्चन, शाहरुख खान अशा अनेक कलाकारांची नावे आहेत. रोज सकाळी आपल्याला उठावेच लागते आणि या सूर्य प्रकाशात स्वत:च्या हक्कासाठी लढाई लढावीच लागते. आयुष्यात कोणतीही गोष्ट संघर्ष केल्याशिवाय मिळत नाही.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Drona Flopped not Getting Films said by Abhishek Bachchan