आयुष्यमानकडून मिळाला शिकण्याचा नाविन्यपूर्ण अनुभव ; राधिका आपटे

Film Companion Andhadhun Ayushmann Khurrana Radhika-Apte.jpg
Film Companion Andhadhun Ayushmann Khurrana Radhika-Apte.jpg

मुंबई - ख्यातनाम दिग्दर्शक श्रीराम राघवन दिग्दर्शित अंधाधुन या चित्रपटाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने चित्रपटातील अभिनेत्री राधिका आपटे हिने आपला सहकलाकार आयुष्यमान खुराणा सोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त या चित्रपटाला रसिकांची पसंती मिळाली होती. विशेष म्हणजे त्याला जाणकार प्रेक्षक, समीक्षक यांनी देखील अंधाधुनला गौरविले होते.

2018 मध्ये अंधाधुन चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकाला खिळवून ठेवणारे वेगवान कथानक, त्याची तितकीच सुंदर मांडणी यामुळे इतर चित्रपटांच्या तुलनेत हा चित्रपट वेगळा ठरला.  प्रेक्षकाची शेवटपर्यत ताणून ठेवलेली उत्कंठा यामुळे तो अधिकच रसिकांच्या पसंतीस उतरला. दोन वर्षे या चित्रपटाला होत आहेत त्याचे निमित्त साधून राधिकाने आपला अनुभव व्यक्त केला आहे. अंधाधुनच्या सेटवरील आठवणींविषयी सांगताना राधिकाने आयुषमानचे कौतूक केले आहे. ती म्हणते, आयुष्यमान बरोबर काम करणे यातून खुप काही शिकता आले. तो अनुभव खुप शिकवणारा होता.

अंधाधुन हा चित्रपट माझ्यासाठी खुप महत्वाचा चित्रपट आहे. त्याचा एक वेगळा अनुभव आणि प्रभाव माझ्यावर आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मला नवे समविचारी मित्र जोडता आले. यामुळे खुप शिकता आले. त्या सर्व मित्रांकडून नवीन शिकण्याची प्रेरणा मिळाली. जे फार महत्वाचे म्हणता येईल. याशिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन आणि सहकलाकार आयुषमान खुराणा यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव समृध्द करणारा होता. असे सांगता येईल. ज्यावेळी या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हाचा आनंद अविस्मरणीय होता. प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद आणि त्यांनी केलेले कौतूक खुप आनंद देणारे होते.

अंधाधुन चित्रपटात राधिकाने सोफी या मुलीची भुमिका साकारली होती. ती पुढे आयुषमानच्या प्रेमात पडते. डार्क कॉमेडी, सस्पेंन्स या प्रकारातील चित्रपटात आयुषमान आणि राधिकाने साकारलेल्या भुमिकेचे प्रेक्षकांनी भरभरुन कौतूक केले. नुकतेच रात अकेली है या एका चित्रपटात राधिकाने काम केले आहे. आता ती इंटरनॅशनल प्रोजेक्टवर काम करत असून '' अ कॉल टू स्पाय'' यातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com