Akshay Kumar got trolled | भारत-पाक सामन्यानंतर 'पनौती' म्हणत अक्षय कुमारला केलं ट्रोल| | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar

भारत-पाक सामन्यानंतर 'पनौती' म्हणत अक्षय कुमारला केलं ट्रोल

भारतीय संघाच्या टी२० विश्वचषक २०२१च्या (T20 World Cup 2021) प्रवासाला कालपासून (रविवार) सुरुवात झाली. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना दुबईमध्ये (Dubai) रंगला होता. हा सामना बघण्यासाठी भारतीय चाहत्यांसोबतच बॉलिवूडचे काही सेलिब्रिटीदेखील पोहोचले होते. T20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताविरुद्ध सामन्यात विजय मिळवल्यानंतर काही मिनिटांतच ट्विटरवर स्टेडियममधून सामना पाहणाऱ्या अभिनेता'अक्षय कुमार'ला ट्रोल करणास सुरुवात झाली. 'पनौती' म्हणत नेटकऱ्यांनी मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली.

पकिस्तान संघाने टीम इंडियाला एकहाती पराभूत केलं. स्टेडियममध्ये अक्षय कुमार उपस्थित होता, म्हणूनच भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही, अशी टीका नेटकऱ्यांकडून होऊ लागली. अक्षय कुमारवरील हे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका यूजरने लिहिले, 'जेव्हा भारत हरत होता ,तेव्हा हा माणूस हसत होता.' तर एकाने अक्षयचा फोटो एडिट करत त्यावर लिहिलं, 'मी पहिल्यांदा स्टेड‍ियममध्ये मॅच बघायला आलो आणि भारतीय संघ पराभूत झाला.' अक्षय कुमार रील लाइफ पनौतीपासून रिअल लाईफपर्यंत, असेही मीम्स व्हायरल होत आहेत.

टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात होता. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्ताने भारतावर १० विकेटने विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने दिलेले १५० धावांचे आव्हान पाकिस्तानने एकही गडी न गमावता पूर्ण केले. आजच्या सामन्यासह दोन्ही संघ १३ वेळा वर्ल्ड कपमध्ये भिडले आहेत. यात १२ वेळा भारताने विजय मिळवला होता. मात्र यात एकदाही १० विकेट्सने भारताला जिंकता आले नव्हते. पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताविरोधात विजय मिळवत ही कामगिरी केली आहे.