रिअ‍ॅलिटी शोजच्या परीक्षकांवर भडकले अभिजीत भट्टाचार्य

अभिजीत यांनी नुकतीच 'इंडियन आयडॉल १२'मध्ये हजेरी लावली होती.
Abhijeet Bhattacharya
Abhijeet Bhattacharya facebook
Updated on

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य Abhijeet Bhattacharya यांनी रिअॅलिटी शोजच्या परीक्षकांना सुनावलं आहे. जे परीक्षक स्वत:ची प्रसिद्धी करू पाहतात, ते खरे परीक्षक नाहीत, अशी टीका त्यांनी केली. नव्वदच्या दशकात लोकप्रिय पार्श्वगायक असणारे अभिजीत यांनी नुकतीच 'इंडियन आयडॉल १२'मध्ये Indian Idol हजेरी लावली होती. इंडस्ट्रीतील काही लोकांसोबत स्टेज शेअर करायची इच्छा नसल्याने इतके दिवस कोणत्याच कार्यक्रमात हजेरी न लावल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. (After Indian Idol appearance Abhijeet Bhattacharya slams reality show judges)

'बॉलिवूड स्पाय'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, 'इंडियन आयडॉलच्या परीक्षकांना मी स्पष्ट सांगितलं, की मी तुमच्याकडे काम मागत नाहीये. पण ते खरंच माझं आहे, ते तुमच्याकडे मागतोय. लोक माझ्या हाताखाली काम करतात. मी मालक आहे. ज्यांनी आयुष्यात चार गाणी गायली आहेत, अशा लोकांना ते परीक्षक म्हणून बोलवतात. ज्यांनी संगीताची सेवा केली नाही, अशा लोकांना परीक्षक बनवलं जातं. ते फक्त व्यावसायिक आहेत. त्यांनी फक्त हिट गाणी दिली आहेत, पण त्यांनी संगीत अजिबात दिलं नाही.'

Abhijeet Bhattacharya
मराठी मालिका गाजवणाऱ्या 'या' अभिनेत्रीला आता ओळखणंही कठीण

'आज जर आरडी बर्मन जिवंत असते, तर त्यांना बोलावलं नसतं. मलासुद्धा पुरस्कार दिले जात नाहीत. आरडी बर्मन, किशोर कुमार आणि माझ्यात हेच साम्य आहे. आम्हा तिघांच्या प्रतिभेला कोणी ओळखत नाही. हे मूर्ख लोक मला दुर्लक्ष करून स्वत:ची पोलखोल करून घेतात. स्वत:ची प्रसिद्धी करून घेणारे खरे परीक्षक कधीच नसतात. ते स्पर्धकांचा वापर करून घेतात', अशा शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला.

Abhijeet Bhattacharya
मराठी मालिकांमध्ये खलनायकी पात्र गाजवणारे कलाकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com