पेट्रोल पंपवर काम करत कविता करणा-या गुलजार यांना अशी मिळाली होती पहिली संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

guljar

भारताची विभागणी झाल्यानंतर गुलजार आणि त्यांचं कुटुंब अमृतसरमध्ये स्थित झालं. वाचन आणि लिखाणाची आवड असलेल्या गुलजार यांना पैश्यांच्या कमतरतेमुळे त्यांच शिक्षण पूर्ण करता आलं नाही

पेट्रोल पंपवर काम करत कविता करणा-या गुलजार यांना अशी मिळाली होती पहिली संधी

मुंबई- हिंदी सिनेमातील असा हिरा ज्यांच्या लिखाणाची जादू अनेकांवर आहे. गुलजार त्यांच्या लिखाणातून कोणत्याही माणसाला अगदी सहजतेने त्याच्या ख-या आयुष्यातून स्वप्नांच्या आयुष्यात पाठवतात. एक असे गीतकार जे त्यांच्या लिखाणाने 'तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हू मे' सारखं गाणं लिहून विचार करायला भाग पाडतात तर दुसरीकडे 'नमक ईस्क का' हे गाणं लिहून प्रेक्षकांचं मनोरंजन देखील करतात.

हे ही वाचा: धनश्री वर्माचा 'दारु बदनाम' गाण्यावरचा हा जबरदस्त डान्स होतोय व्हायरल

भारताची विभागणी झाल्यानंतर गुलजार आणि त्यांचं कुटुंब अमृतसरमध्ये स्थित झालं. वाचन आणि लिखाणाची आवड असलेल्या गुलजार यांना पैश्यांच्या कमतरतेमुळे त्यांच शिक्षण पूर्ण करता आलं नाही. शिक्षण सोडल्यानंतर त्यांना पेट्रोल पंपवर नोकरी करावी लागली होती. पेट्रोल पंपवर काम करता करता शायरीची आवड असणा-या गुलजार यांनी त्यांच्या कविता कागदावर उतरवण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते मुंबईला आले.

या मायानगरी मुंबईत त्यांना अशा कित्येक रात्री अंधारात काढाव्या लागल्या. पोटापाण्यासाठी गुलजार यांनी मग मुंबईतील वरळीत एका गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम सुरु केलं. यादरम्यान ते 'प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशन' सोबत जोडले गेले. तिथे त्यांची भेट अनेक शायर आणि साहित्यिकांशी झाली. अशा प्रकारे त्यांची भेट गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार एसडी बर्मन यांच्याशी झाली. 

शैलेंद्र यांनीच गुलजार यांची एस डी बर्मन यांच्योसोबत भेट घालून दिली होती असं म्हटलं जातं. हा तो काळ होता जेव्हा एस.डी बर्मन 'बंदिनी' सिनेमाच्या संगीतासाठी खूपंच बिझी होते मात्र शैलेंद्र यांच्या सांगण्यावरुन त्यांनी गुलजार यांना एक गाणं लिहिण्याची संधी दिली. गुलजार यांना ही संधी कोणत्याही परिस्थितीत गमवायची नव्हती आणि म्हणूनंच त्यांनी ५ दिवसात गाणं तयार केलं. 'बंदिनी' सिनेमाचे दिग्दर्शक बिमल रॉय यांना देखील गाणं आवडलं. अशा प्रकारे गुलजार यांचं पहिलं गाणं तयार झालं. हे गाणं होतं मोरा गोरा अंग लई ले मोहे श्याम रंग दई दे. विशेष म्हणजे गुलजार यांच्या पहिल्याच गाण्याला लता मंगेशकर यांनी आवाज दिला होता.    

after landing in mumbai gulzar had a tough time for survival he worked as a car mechanic in a garage at worli  

loading image
go to top