esakal | धनश्री वर्माचा 'दारु बदनाम' गाण्यावरचा हा जबरदस्त डान्स होतोय व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

dhanashree varma

धनश्री सोशल मिडियावर नेहमीच तिच्या डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असते जे पाहून तिचे चाहते वेडे होतात. नुकताच धनश्री वर्माने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे जो सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

धनश्री वर्माचा 'दारु बदनाम' गाण्यावरचा हा जबरदस्त डान्स होतोय व्हायरल

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई-  भारतीय टीम क्रिकेटर युजवेंद्र चहल याने नुकताच साखरपुडा केला आहे. चहलने सोशल मिडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना त्याच्या साखरपुड्याची बातमी दिली होती. चहल डॉक्टर धनश्री वर्माशी लग्न करणार असल्याचं त्याने सांगितलं. साखरपुड्यानंतर दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत आहेत. धनश्री वर्मा प्रसिद्ध युट्युबर देखील आहे. धनश्री सोशल मिडियावर नेहमीच तिच्या डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असते जे पाहून तिचे चाहते वेडे होतात. नुकताच धनश्री वर्माने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे जो सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

हे ही वाचा: मलाईका अरोराने शेअर केल्या ब्युटी टीप्स, काय आहे मलाईकाचं ब्युटी सिक्रेट?

धनश्री वर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती प्रसिद्ध पंजाबी गाणं दारु बदनामवर डान्स करताना दिसतेय. या डान्समधील तिची एनर्जी जबरदस्त आहे. डान्स दरम्यान तिच्या मुव्हज पाहून चाहते नक्कीच घायाळ होतील. व्हिडिओमध्ये धनश्री सफेद रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाच्या शॉर्ट्समध्ये दिसतेय. तिच्या या व्हिडिओला आत्तापर्यंत ७ लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. धनश्रीच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या उड्या पडल्या आहेत. तिच्या डान्सवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना धनश्रीने कॅप्शनमध्ये लिहिलंय, हे माझं सगळ्यात आवडतं आहे. हा जुना व्हिडिओ शेअर करण्यासाठी मी खूप वाट पाहत होती. 

धनश्री नेहमीच तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. युजवेंद्र बद्दल सांगायचं झालं तर तो आयपीएलच्या १३ व्या सीझनसाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या जर्सीमध्ये दिसण्यासाठी पूर्ण तयार आहे. आयपीएलचा १३ वा सिझन १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये पार पडणार आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमी आयपीएल सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.    

indian cricketer yuzvendra chahal fiance dhanshree verma performed on daru badnaam  

loading image
go to top