रिया चक्रवर्तीनंतर ईडी करणार निर्माता संदीप सिंहची चौकशी

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 10 August 2020

सुशांतच्या अकाऊंटमधून १५ कोटी रुपयांची अफरातफर झाली आहे. ईडी याच प्रकरणात तपास करत आहे. सीबीआयने देखील या प्रकरणात एफआयआर दाखल केली आहे. 

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास ईडी देखील करत आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आणि अफरातफर करण्याचा आरोप लावल एफआय़आर दाखल केली आहे. त्यांनी या तक्रारीमध्ये म्हटलंय की सुशांतच्या अकाऊंटमधून १५ कोटी रुपयांची अफरातफर झाली आहे. ईडी याच प्रकरणात तपास करत आहे. सीबीआयने देखील या प्रकरणात एफआयआर दाखल केली आहे. 

रिव्ह्यु: पुरुषीपणाला सणसणीत उत्तर "गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल "

ईडीने आत्तापर्यंत रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, वडिल इंद्रजीत आणि सुशांतची बिझनेस मॅनेजर असलेली श्रुती मोदी यांची चौकशी केली आहे. नुकत्याच मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार ईडी निर्माता संदीप सिंहची देखील चौकशी करण्याची शक्यता आहे. ईडीला असं कळालं आहे की सुशांत आणि संदीप सिंह यांच्या बँक अकाऊंटमध्ये काही व्यवहार झाले आहेत. संदीर स्वतःला सुशांतचा चांगला मित्र म्हणवतो आणि सुशांतच्या अंतिम संस्काराच्या वेळी देखील तो हजर होता.

नुकत्याच एका मुलाखतीत सुशांतची मैत्रीण स्मिता पारेखने सांगितलं होतं की सुशांतच्या कुटुंबामध्ये संदीप सिंहला कोणी ओळखत नाही. तिने असा देखील आरोप लावले आहेत की सुशांतचा मृतदेह संदीपच्या सांगण्यावरुन कूपर रुग्णालयात नेला गेला होता. स्मिताने सांगितलं की संदीपचा पीआरच सुशांतच्या बहीणीसोबत त्याचे फोटो काढत होता. ती म्हणाली की कदाचित असं असू शकतं की तो खूप आधी सुशांतचा मित्र असेल. 

ईडीने शुक्रवारी रियाची चौकशी केल्यानंतर आज सोमवार रोजी तिला तिच्या कुटुंबासोबत पुन्हा चौकशीसाठी बोलवलं होतं. काही वेळापूर्वीच रियाने सुप्रिम कोर्टात माध्यमांविरोधात मिडिया ट्रायलचा आरोप करत याचिका दाखल केली आहे.        

after rhea chakraborty sandip singh to be summoned by enforcement directorate in sushant case  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after rhea chakraborty sandip singh to be summoned by enforcement directorate in sushant case