esakal | ट्विटरनंतर कंगनाला फॅशन डिझायनर्सकडून धक्का; सोबत काम करण्यास दिला नकार

बोलून बातमी शोधा

kangana ranaut
ट्विटरनंतर कंगनाला फॅशन डिझायनर्सकडून धक्का; सोबत काम करण्यास दिला नकार
sakal_logo
By
स्वाती वेमूल

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत Kangana Ranaut हिचा ट्विटर अकाऊंट Kangana Twitter मंगळवारी सस्पेंड करण्यात आला. ट्विटरच्या नियमांविरोधात जाऊन ट्विट केल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर बॉलिवूडच्या दोन प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सनी तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे. आनंद भूषण Anand Bhushan आणि रिमझिम दादू Rimjhim Dadu यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित कंगनासोबत काम करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. (After Twitter bans Kangana Ranaut designers refuse to work with her)

'आज घडलेल्या काही घटनांनंतर आम्ही कंगना राणावतसोबत कोलॅबोरेशनचे पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावरून काढून टाकण्याचा निर्णय घेत आहोत. त्याचसोबत कंगनासोबत भविष्यात कोणतंही काम करणार नसल्याचा निश्चय आम्ही करतोय. आमचा ब्रँड भडकाऊ भाषणाला किंवा विधानांना साथ देत नाही,' अशी पोस्ट डिझायनर आनंद भूषण यांनी लिहिली. त्यानंतर डिझायनर रिमझिमनेही आनंदच्या पावलांवर पाऊल ठेवत कंगनासोबत काम करण्यात नकार दिला. 'योग्य गोष्ट करण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो. आमच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील कंगनासोबतचे सर्व फोटो आणि पोस्ट आम्ही डिलिट करत आहोत आणि भविष्यात आम्ही तिच्यासोबत काम करणार नसल्याचा निर्णय घेत आहोत', असं रिमझिमने स्पष्ट केलं.

हेही वाचा : दीपिका पदुकोणला कोरोना; कुटुंबीयांना भेटायला गेली होती बेंगळुरूला

img

आनंद आणि रिमझिम यांच्या या निर्णयाचं अभिनेत्री स्वरा भास्करने स्वागत केलं. तर कंगनाची बहीण रंगोली चांडेल हिने या डिझायनर्सविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

का केलं ट्विटर अकाऊंट सस्पेंड?

निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल कंगनाने ट्विट केलं होतं. या ट्विटनंतर कंगनाचं ट्विटर अकाऊंट काही काळासाठी बंद करण्यात आलं आहे. कंगनाने तृणमूल काँग्रेस पार्टी आणि ममता बॅनर्जी यांच्या विरोधात ट्विट केलं होतं. तिने एक व्हिडीओसुद्धा पोस्ट केला होता. ज्यामध्ये निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या महिलांना मारहाण केली जात होती.