esakal | दीपिका पदुकोणला कोरोना; कुटुंबीयांना भेटायला गेली होती बेंगळुरूला

बोलून बातमी शोधा

deepika padukone

दीपिका पदुकोणला कोरोना; कुटुंबीयांना भेटायला गेली होती बेंगळुरूला

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री दीपिका पदुकोणला Deepika Padukone कोरोनाची लागण झाली. दीपिका सध्या बेंगळुरूमध्ये तिच्या कुटुंबीयांसोबत आहे. दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण, आई उज्ज्वला आणि बहीण अनिषा यांचासुद्धा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दीपिकाच्या वडिलांना बेंगळुरुमधल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात दीपिका आणि तिचा पती रणवीर सिंग Ranveer Singh यांना मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी हे दोघं बेंगळुरूला रवाना झाले होते. दीपिकाच्या प्रकृतीविषयीची आणखी माहिती अद्याप समोर आली नाही. (Deepika Padukone tests positive for Covid 19)

"दहा दिवसांपूर्वी प्रकाश यांची पत्नी उज्ज्वला आणि दुसरी मुलगी अनिशा यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. कोरोनाची चाचणी केली असता त्या दोघींचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला", अशी माहिती प्रकाश पदुकोण यांचे जवळचे मित्र विमल कुमार यांनी 'पीटीआय'शी बोलताना दिली. "त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं मात्र आठवड्याभरानंतरही प्रकाश यांचा ताप कमी होत नव्हता. त्यामुळे गेल्या शनिवारी त्यांना बेंगळुरूमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती आता ठीक असून पत्नी आणि मुलगी घरीच आहेत. प्रकाश यांना पुढील दोन-तीन दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे", असं ते पुढे म्हणाले.

हेही वाचा : दीपिका पदुकोणचे वडील रुग्णालयात दाखल; आई आणि बहीणसुद्धा कोव्हिड पॉझिटिव्ह

दीपिकाच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, ती लवकरच '८३' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणवीर आणि दीपिका एकत्र काम करणार आहेत. यामध्ये रणवीर हा क्रिकेटर कपिल देव यांची तर दीपिका कपिल देव यांची पत्नी रुमीची भूमिका साकारणार आहे. याशिवाय ती 'पठाण' या चित्रपटात शाहरुख खानसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे.