esakal | ‘Koo तुमच्या घरासारखे बाकी सगळे.. ’, ट्विटरने बॅन करताच कंगनाचे 'कू'वर जंगी स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut

‘Koo तुमच्या घरासारखे बाकी सगळे.. ’, ट्विटरने बॅन करताच कंगनाचे 'कू'वर जंगी स्वागत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला Kangana Ranaut नुकतेच ट्विटरने Twitter बॅन केले. यामुळे कंगना आता सोशल मीडियावर तिची मत मांडू शकणार नाही असे अनेकांना वाटले. पण कंगनाने तिचे विचार मांडण्यासाठी वेगळ्या अ‍ॅपचा आधार घेतला आहे. या अ‍ॅपचे नाव 'कू' Koo असे आहे. ट्विटरवरून बॅन झालेल्या कंगनाचे 'कू' अ‍ॅपच्या संस्थापकाने जोरदार स्वागत केले आहे. 'कू' चे सीईओ व संस्थापक व सह संस्थापक अप्रमेय राधाकृष्णनने कंगनाच्या 'कू' पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. स्क्रिनशॉट शेअर करत त्यांनी लिहीले, 'ही कंगनाची पहिली कू पोस्ट आहे. तिने कू अ‍ॅपला स्वत:च्या घरासारखे तर इतर अॅपला भाड्याच्या घरासारखे म्हटले आहे. जे अगदी योग्य आहे.' (After Twitter bans Kangana Ranaut homegrown Koo app founders welcome her)

कंगनाने तिच्या कू अ‍ॅपवरील पहिल्या पोस्टमध्ये लिहीले होते, 'हॅलो, सध्या मी रात्री काम करत आहे. धाकड चित्रपटाच्या क्रुचा लंच ब्रेक आहे. या ब्रेकमध्ये मला लक्षात आले की मी 'कू'वर पोस्ट करावी. हे अ‍ॅप माझ्यासाठी नवे आहे. त्यामुळे मला समजायला वेळ लागेल. पण भाड्याचे घर शेवटी भाड्याचेच असते आणि आपले घर हे आपलेच असते.'

हेही वाचा : 'दृश्यम २'च्या निर्मात्याविरुद्ध गुन्हा दाखल

शेतकरी आंदोलन, नेपोटिझम, बॉलिवूड ड्रग्स प्रकतरण, सुशांत सिंह राजपूत प्रकरण, महाराष्ट्र सरकार यांसारख्या विषयांवर कंगना तिची मतं सोशल मीडियावर बिनधास्तपणे मांडत होती. अनेक वेळा तिला तिच्या वक्तव्यांमुळे ट्रोलदेखील केले जात होते. पण कंगना व्यक्त होत होती. तिच्या अनेक ट्विट्समुळे वाद निर्माण होत होते. अखेर नियमांविरुद्ध ट्विट केल्याने ट्विटरने मंगळवारी तिला बॅन केले. 'कू' हा ट्विटरसारखाच अ‍ॅप आहे. कू हे भारतीय अ‍ॅप असून हिंदी, तेलगू, कन्नड, बंगाली, तामिळ, मल्याळम, गुजराती, पंजाबी, ओडिशी, आसामी या भाषांमध्ये हे उपलब्ध आहे. आत्मनिर्भर अ‍ॅप चॅलेंजचा अवॉर्ड या अ‍ॅपला मिळाला आहे.