Urfi Javed: उर्फी, तेही कपडे घालून.. बाबो.. भरून आलं! एक व्हिडिओ शंभर कमेंट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

after Urfi Javed wear full dress fans put funny comment and said bhavuk ho gaya

Urfi Javed: उर्फी, तेही कपडे घालून.. बाबो.. भरून आलं! एक व्हिडिओ शंभर कमेंट..

Urfi Javed: बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेदआपल्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेद आणि विचित्र फॅशन हे गणित आता चांगलेच जुळले आहे. उर्फी जावेद कपड्यांवर सतत प्रयोग करत असते आणि ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. बऱ्याचदा ती अत्यंत तोकड्या कपड्यात समोर येत असते. किंवा कपड्यांच्या गाडी काहीतरी गुंडाळून येत असते. पण उर्फीने चक्क आश्चर्याचा धक्का दिला आहे. एरव्ही अर्धवट कपड्यांमध्ये येणारी उर्फी चक्क पूर्ण कपडे घालून कॅमेऱ्यासमोर आली आहे. त्यामुळे हा धक्का चाहत्यांनाही पचला नाही.

(after Urfi Javed wear full dress fans put funny comment and said bhavuk ho gaya )

हेही वाचा: Aastad Kale: चर्चा तर होणारच! आस्ताद काळे आणि आदिती सारंगधर एकत्र..

उर्फी एका इव्हेन्टनंतर कॅमेऱ्यासमोर आली. यावेळी उर्फी चक्क पूर्ण कपड्यांमध्ये दिसली. तिला अशा अवतारात पाहून पापाराझी आणि चाहतेही थक्क झाले. ती सगळ्यांसमोर येताच कमेंट सुरु झाल्या. एकाने तर 'तुम्हाला पाहून मी भावूकी झालो आहे' अशी प्रतिक्रिया दिली. तर एकाने 'आज तू खूप छान दिसतेयस' असेही म्हंटले आहे. एवढेच नव्हे तर एकाने 'उर्फी, आय लव्ह यू..' असेही म्हंटले आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4:जितूच्या सरप्राइजने स्पर्धकांना अश्रु अनावर.. काय केलं असं?

तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे. तिथे तर उर्फीच्या या अवतारावर नेटकरी फिदा झाले आहेत. तिला पूर्ण कपड्यात पाहून कमेंटचा जणू पाऊसच सुरु आहे. 'अरे हि कपडे पण घालते का?' अशी विनोदी कमेंट एकाने केली आहे. तर 'अरे हिच्याकडे कपडे पण आहे का?'. 'आज जरा जास्तच कपडे झाले', 'काहीही बोला पण ती खूप पॉसिटीव्ह' अशा शंभरहून अधिक कमेंट तिला मिळाल्या आहेत.

फॅशन जगतात रोज तिच्या कपड्यांवर प्रयोग करणारी उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. उर्फी तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. ती तिच्या लूकने सोशल मीडियावर दहशत निर्माण करते. प्रत्येक वेळी तिची नवीन स्टाईल लोकाना वेड लावते. अनेकदा ती ट्रोल देखील झाली आहे.