डॉक्टरकडून परतले बिग बी आणि म्हणाले 'डावा डोळा फडफडणं अशुभ असतं'

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जानेवारी 2020

काही दिवसांपूर्वीच बिग बी यांची तब्येत बिघडली होती. थोडीशी तब्येत सुधारली तर ते लगेचच कामावर जातात. नुकतेच ते डॉक्टरकडून परतले आणि चाहत्यांना काळजीत टाकणारं असं एक ट्विट त्यांनी केलं आहे. 

मुंबई : बॉलिवूडमधले शहनशाह म्हणजेच अमिताभ बच्चन होय. त्यांचं वय आणि ज्या पद्धतीने ते काम करतात हे कोण्याही एका तरुण माणसाला लाजविणारे आहे. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे ते आताही देत आहेत. बॉलिवूडच्या या महानायकाला काही दिवसांपूर्वीच 'दादासाहेब फाळके अवॉर्ड' मिळाला. मात्र काही दिवसांपूर्वीच बिग बी यांची तब्येत बिघडली होती. थोडीशी तब्येत सुधारली तर ते लगेचच कामावर जातात. नुकतेच ते डॉक्टरकडून परतले आणि चाहत्यांना काळजीत टाकणारं असं एक ट्विट त्यांनी केलं आहे. 

अमिताभ बच्चन यांनी डोळ्याचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये बिग बी यांनी लिहिलं आहे की, "डावा डोळा फडफडू लागला आहे. लहानपणी असं ऐकलं होतं की अशुभ असतं. डॉक्टरकडे गेलो तर, हे निघालं. डोळ्यामध्ये एक काळा डाग तयार झाला आहे. डॉक्टरांनी सांगतिलं की वयामुळे असं होतं. यावर डॉक्टरांनी उपाय असा सुचवला की, लहानपणी जसं आई थोडा गुंडाळून त्यावर फुंकर मारायची आणि तो गरम करुन डोळ्यावर लावायची. तसंच करा म्हणजे सर्व ठीक होईल.''

आईच्या आठवणीत भावूक झालेले बिग बी पुढे म्हणाले, ''आई तर नाही आता म्हणून लाइटच्या मदतीने रुमाल गरम करुन डोळ्याला लावला. पण, काही सुधारलं नाही. आईचा पदर तो शेवटी आईचा पदरच असतो.'' अमिताभ यांच्या इमोशनल पोस्टवर चाहत्यांनीही अनेक भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांना लवकरच बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
बिग बी लवकरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटातून दिसणार आहेत. शिवाय आयुष्मान खुरानासोबत 'गुलाबो सिताबो' या चित्रपटातूनही ते दिसणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Visit To The Doctor Amitabh Bachchan shares emotional post