
अभिजीत आणि आसावरीची सून शुभ्रा यांचे दत्तांजींचं मन वळविण्याचे व लग्नाला संमती देण्यासाठी असंख्य प्रयत्न झाले, मात्र अखेर आसावरी आणि शेफ अभिजीत लग्नबंधनात अडकले! पण, या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
मुंबई : कोणत्याही तरूण जोडप्याला लाजवेल अशी लव्हस्टोरी सध्या 'अगं बाई सासूबाई'मध्ये सुरू आहे. ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात काही काळातच यशस्वी ठरली आहे.अभिजीतचं आसावरीवरचं अपार प्रेम आणि आसावरीचे सासरे दत्ताजी यांचा या प्रेमाला असणारा विरोध आतापर्यंत आपण बघत आलो. पण आता या मालिकेला एक इंटरेस्टींग वळण येणार आहे. अभिजीत आणि आसावरीची सून शुभ्रा यांचे दत्तांजींचं मन वळविण्याचे व लग्नाला संमती देण्यासाठी असंख्य प्रयत्न झाले, मात्र अखेर आसावरी आणि शेफ अभिजीत लग्नबंधनात अडकले! पण, या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
लग्नंबधनात अडकल्यावर अभिजीत आणि आसावरीचा संसार सुरु तर झाला आहे. लग्न सोहळ्यानंतर आता हे कपल राजस्थान-उदयपुरला फिरायला गेले आहेत. आसावरीला नेहमीच स्वत: आधी घरातील सदस्यांचा विचार करते. आजोबा, सोहम आणि शुभ्रा यांची आसावरीला सतत काळजी वाटत असते. फिरायला गेल्यावरही तिला त्यांची चिंता वाटत आहे.
आसावरीचा लाडका बबड्या म्हणजेच सोहमला हे नातं पटलं नव्हतं. त्याने आसावरी आणि अभिजीतच्या नात्याला नेहमीच विरोध केला आहे. अखेर तो लग्नासाठी तयार झाला. पण, लग्नानंतर आता हे नातं कसं संपेल असा बेत त्याने केला आहे. त्या दोघांना कशाप्रकारने एकमेकांपासून वेगळे करता येईल याची योजना सोहम करतो आहे. यासाठी त्याने प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. आसावरी आणि अभिजीत यांना एकमेकांपासून वेगळं ठेवण्यासाठी सोहम शुभ्राला घेऊन उदयपूरला पोहोचला आहे.
आता या ट्रीपमध्ये आसावरी आणि अभिजीत यांना वेगळं करण्यासाठी सोहम कोणतं व्यत्य आणणार हे पाहावं लागेल. त्याचा हा प्लान यशस्वी होईल का हे येत्या एपिसोडमध्ये पाहावं लागेल.
आतापर्यंत मालिकेत काय घडले ?
साधारण पन्नाशीच्या वर असलेलं वय, घरात सासरे, मुलगा-सून अशा परिस्थितीत अडकलेली आसावरी (निवेदिता सराफ)... एक यशस्वी शेफ आणि उद्योजक असलेला अभिजीत (गिरीश ओक) एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण आजूबाजूच्या परिस्थितीमुळे व दत्ताजींनी परवानगी दिली नाही म्हणून त्यांना लगेच लग्न करता येत नाही. असावरीची असाह्यता आणि अभिजीतचा असलेला संयमी स्वभाव यांमुळे हे प्रेम टीकून आहे. अभिजीतने दत्ताजींचं मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. तुमच्या सुनेला सुखी ठेवेन ही खात्री दिली, तरी अभिजीत काही दत्ताजींना पसंत पडेना. पण आता अभिजीतने अशी काही जादू केलीय की दत्ताजींनीही या लग्नाला परवानगी दिली.