Ahaan Panday : मोहित सुरीच्या यंग लव स्टोरीत चमकणार अनन्याचा भाऊ 'अहान'!

Ananya's brother 'Ahaan' to star in Mohit Suri's Young Love Story; अनन्या पांडेचा भाऊ अहान हा देखील आता बॉलीवूडमध्ये दिसणार आहे.
Ahaan Panday New Movie
Ahaan Panday New Movieesakal

Ahaan Panday New Movie : प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडेच्या बॉलीवूडमधील दमदार एंट्रीनंतर आता तिच्या चुलत भावाची अहान पांडेचं डेब्यू होणार असल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अहानच्या बॉलीवूड डेब्यूची चर्चा रंगली होती.

भारतातील मनोरंजन विश्वातील मोठी निर्मिती संस्था, यशराज फिल्म्सचे प्रमुख, आदित्य चोप्रा यांनी देशातील अनेक यंग टॅलेंटचा शोध घेतला आहे. यापूर्वी आदित्य यांनी बॉलीवूडला अनेक मोठे स्टार दिले. भारताला या पिढीतील दोन मोठे तारे दिले आहेत. त्यात अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंग, ज्यांनी आपल्या अदाकारीनं चाहत्यांना प्रभावित केलं आहे. आदित्य आता अहानला समोर आणण्याच्या तयारीत आहेत.

अहानला पाच वर्षांपूर्वी YRF टॅलेंट म्हणून आदित्य चोप्राने वैयक्तिकरित्या तयार केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांतून जाण्यासाठी साइन केले होते. मोठ्या पडद्यावर येण्याची अहानची प्रतीक्षा आता संपली आहे. त्याला YRF आणि मोहित सुरीच्या यंग लव स्टोरी मध्ये संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ट्रेड मधील सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, आदित्य चोप्रा अहानला अनेक वर्षांपासून डेब्यू म्हणून लाँच करण्यासाठी प्रयत्नशील आहे. इंडस्ट्रीसाठी, अहान पांडेचे लाँच हे हिंदी चित्रपट उद्योगात अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. YRF ला त्याच्या माध्यमातून एक सुपरहिरो प्रोजेक्ट करण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्याला एका मोठ्या प्रोजेक्टसाठी त्याला साइन करण्यात आले असून त्या चित्रपटाचा विषय लव स्टोरीचा असल्याची चर्चा आहे.

Ahaan Panday New Movie
Kangana Ranaut: "मला कोणतीही भूमिका देऊ नका अन्यथा..."; अॅनिमलच्या दिग्दर्शकाला कंगना थेटच म्हणाली, पण नेमकं कारण काय?

अहाननं मोहित सुरीच्या चित्रपटासाठी ऑडिनशन दिली असून त्यानं आता त्याला त्याच्या मोठ्या संधीची प्रतिक्षा आहे. यशराज फिल्म्स मोहित सुरी (आशिकी 2, एक व्हिलन) सोबत एका वेगळ्या प्रोजेक्टसाठी चर्चेत आहे. कंपनीचे सीईओ अक्षय विधानी निर्मित हा पहिलाच चित्रपट आहे. आदित्य चोप्रा,जे YRF च्या या आगामी प्रोजेक्टचे नाव ठरले नसून तो यंदाच्या वर्षाच्या शेवटी फ्लोअरवर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com