
5 वर्षांचा ब्रेक घेऊन 2015 मध्ये जज्बा या चित्रपटातून कम बॅक केले. त्यात ती अभिनेता इरफान खान बरोबर दिसली होती. याशिवाय सरबजीत, ए दिल है मुश्किल आणि फन्ने खां चित्रपटांतून तिने भूमिका केल्या.
मुंबई - बॉलीवूडची लावण्यसम्राज्ञी ऐश्वर्या राय बच्चनचे चाहते जगभरात आहेत. केवळ आपल्या रुपानेच नव्हे तर अभिनयानेही रसिकांच्या मनावर अधिराज्य करणा-या या अभिनेत्रीची लहानपणापासून एक इच्छा होती. आपण मोठं झाल्यावर काय होणार याचे उत्तर तिच्याकडे तयार होते. तिचं ते ड्रीम काही पूर्ण झालं नाही. त्यासाठी आवश्यक ती सगळी गुणवत्ता ऐश्वर्याकडे होती. ऐश्वर्याच्या जन्मदिनाच्या निमित्ताने तिच्याशी जोडल्या गेलेल्या आठवणींनी दिलेला हा उजाळा.
खरं तर ऐश्वर्याला मॉडेलिंग आणि चित्रपट व्यवसायात करियर करायचे नव्हते. सुरुवातीला तिला या दोन्ही क्षेत्रांमध्ये फारसा रसही नव्हता. विश्वसुंदरीचा मान मिळवणा-या ऐश्वर्याने आपण त्या करिअरचा स्वीकार करु असाही विचार केला नव्हता. जगभरातील जे प्रख्यात कलाकार आहेत त्यात तिच्या नावाचा समावेश केला जातो. केवळ हिंदीच नव्हे तर वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. ज्या क्षेत्रात यायचे नव्हते त्यातले अनेक मानाचे पुरस्कारही तिने मिळवले आहेत. आपलं सौंदर्य आणि अभिनय यासाठी तिने चाहत्यांची पसंती मिळवली आहे.
1 नोव्हेंबर 1973 रोजी बंगलोर या शहरात जन्माला आलेल्या ऐश्वर्याला अभ्यासात चांगली गती होती. बारावीला तिने 90 टक्के गुण मिळवले होते. लहानपणी तिने क्लासिकल डान्सचे धडे घेतले. यावेळी तिला आपण आपल्या आवडीच्या एका विषयात करियर करावे अशी तिची इच्छा होती. प्राणीशास्त्र हा तिच्या आवडीचा विषय होता. तिला त्यात आपण आपले करियर करावे असे वाटत होते. प्रत्यक्षात झाले सगळे वेगळेच, तिने आपल्याला आर्किटेक्चर व्हायचे होते असे सांगितले. विशेष म्हणजे त्यासाठी तिनं संसद अकादमी ऑफ आर्किटेक्चर मधून प्रशिक्षण घेतलं होतं.
शेवटी मॉडेलिंग मध्ये करियर करण्याचे नक्की झाल्यावर तिने त्यावर लक्ष केंद्रित केलं. त्यासाठी मॉडेलिंगचे धडे गिरवण्यास सुरुवातही केली. 1994 साली तिने मिस वर्ल्डचा किताब जिंकला. यानंतर मात्र ऐश्वर्याने मागे वळुन पाहिले नाही. एका तमिळ चित्रपटातून तिचे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. बॉलीवूडमध्ये 1997 साली तिने और प्यार हो गया से चित्रपटातून इंट्री केली. त्यानंतर तिने उन्होंने आ अब लौट चलें, हम दिल दे चुके सनम, देवदास, जोश, हमारा दिल आपके पास है, मोहब्बतें, हम किसी से कम नहीं, शब्द, क्यों, रेनकोट, द मिस्ट्रेस ऑफ स्पाइसेज, उमराओ जान, धूम 2, गुरू, सरकार राज, जोधा अखबर, एक्शन रिप्ले आणि गुजारिश सारख्या चित्रपटांतून अभिनय केला.
यापुढे तिने 5 वर्षांचा ब्रेक घेऊन 2015 मध्ये जज्बा या चित्रपटातून कम बॅक केले. त्यात ती अभिनेता इरफान खान बरोबर दिसली होती. याशिवाय सरबजीत, ए दिल है मुश्किल आणि फन्ने खां चित्रपटांतून तिने भूमिका केल्या. ज्यांना प्रेक्षकांनी पसंद केले.