PS I Movie: ऐश्वर्या कपिलच्या शो मध्ये आलीच नाही! चाहत्यांचा संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PS I Movie

PS I Movie: ऐश्वर्या कपिलच्या शो मध्ये आलीच नाही! चाहत्यांचा संताप

Bollywood Actress Aishwarya Rai PS I: बॉलीवूड मध्ये कोण कधी आपल्या जुन्या दुश्मनीवर कायम राहील सांगता येत नाही ऐश्वर्या आणि सलमान यांची जुनी दुश्मनी तर सगळ्यांना माहिती आहे. ती अजुनही आहे. ऐश्वर्या रायचा 'पोन्नीयिन सेल्वन-1' हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी, पीएस तमिळ ते हिंदी मध्ये जोरदार प्रमोशन केले जात आहे. याच संदर्भात पोन्नियिन सेल्वन-१ ची टीम 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचली. या शोचा प्रोमोही आदल्या दिवशी रिलीज करण्यात आला होता. नेहमीप्रमाणे यावेळीही स्टारकास्टने खूप धमाल केली. मात्र, असे असूनही ऐश्वर्या रायची अनुपस्थिती होती.

काही लोक 'द कपिल शर्मा शो'मध्ये ऐश्वर्या रायच्या अनुपस्थितीचे कारण सलमान खान सांगत आहेत. सलमान खान द कपिल शर्मा शोचा निर्माता आहे. अशा स्थितीत कपिल शर्माच्या शोमध्ये न येण्याचा निर्णय अभिनेत्रीने जाणूनबुजून घेतल्याचे युजर्सचे मत आहे. त्याचबरोबर काही यूजर्स ऐश्वर्या रायचा बचाव करताना दिसत आहेत.

हेही वाचा: Dharma Production: एनसीबीचा धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितिज प्रसादला दणका!

ऐश्वर्याची बाजू घेणार्‍या नेटिझन्सचे म्हणणे आहे की या आधीही ऐश्वर्याने 'ए दिल है मुश्किल'च्या प्रमोशनसाठी शोमध्ये हजर झाली आहे. याला उत्तर देताना दुसर्‍या यूजरने लिहिले - ऐश्वर्या शोमध्ये आली होती, पण तेव्हा सलमान शोचा निर्माता नव्हता. आता तो आहे तर ऐश्वर्याने हजेरी नाही लावली.

हेही वाचा: Raveena Tondon: रविनानं पुन्हा धरलं बाळसं! कसली दिसतीये...